चंद्रपुरातील रेणुका गेस्ट हाऊस वर पोलिसांची धाड : 13 महाविद्यालयीन जोडपे ताब्यात तार मालक फरार : व्हॅलेंटाईन दिवसाच्या पार्श्वभूमीवर पोलीस चाळेवीरांच्या मागावर #guesthouse - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरातील रेणुका गेस्ट हाऊस वर पोलिसांची धाड : 13 महाविद्यालयीन जोडपे ताब्यात तार मालक फरार : व्हॅलेंटाईन दिवसाच्या पार्श्वभूमीवर पोलीस चाळेवीरांच्या मागावर #guesthouse

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :फेब्रुवारी महिन्यात येणारा व्हॅलेंटाइन डे प्रेमिकांना आकर्षित करित असतो. आज 7 फेब्रुवारी चंद्रपूर येथे रोज डे निमित्याने चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकात असलेल्या रेणुका गेस्ट हाऊस वर गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर पोलिसांनी धाड टाकून 13 जोडप्यांना पकडले असल्याची खात्रीलायक माहिती असुन चंद्रपूर आणि लगतच्या परिसरातील 13 मुले व 13 मुली सापडल्या आहेत.

शिकायला घरून निघणाऱ्या मुली बाहेर अश्या प्रकारचे चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती म्हणुन पोलिसांनी रेणुका गेस्ट हाऊस वर पाळत ठेवुन आज धाड घातली आणि 13 जोडप्यांना रंगेहात पकडल्याचे कळले आहे.

रेणुका गेस्ट हाऊस चे मालक त्रिवेदी फरार झाले असुन नोकर गणेश उपाध्यायला  अटक करण्यात आली आहे तर मुलांवर बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून सध्या सोडण्यात आले असुन मुलींना समज देऊन सोडण्यात आल्याचे वृत्त आहे.