चंद्रपूर ब्रेकिंग : वडिलांनेच केला 11वर्षीय मुलावर अत्याचार : समलैंगिकता व पॉक्सो अंतर्गत दोन आरोपीस अटक #POCSO #377 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : वडिलांनेच केला 11वर्षीय मुलावर अत्याचार : समलैंगिकता व पॉक्सो अंतर्गत दोन आरोपीस अटक #POCSO #377

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -(सायं : 06:35)-सुधारित वृत्त 

वडिलांनेच आपल्या 11 वर्षीय मुलावर अत्याचार केल्या प्रकरणी पीडित मुलाचे वडील व राजुरा शहरातील एका व्यापाऱ्याला अटक झाल्याची टीम खबरकट्टा ने बातमी दिली होती परंतु सुधारित माहिती नुसार फक्त एकच आरोपी व्यापारी पिंटू रागीट (32) अटकेत असून मुलाचे वडील शंकर अजूनही फरारच आहेत. सदर प्रकरणात विशेष म्हणजे मुलाच्या वडिलांवर या पूर्वी सुद्धा आपल्याच मुलीचे शोषण केल्याची तक्रार दाखल असून तो या प्रकरणात जामिनावर असून विभक्त परिवारात मुलगा आई सोबत राहत असताना आई च्या गैरहजरीत जाऊन आपल्या मुलाला त्रास द्यायचा असे चर्चिले जात आहे. 

===================================
 (दुपारी 04:15 : थोडक्यात वृत्त )शहरातील मुख्य मार्केट परिसरातील रहिवासी 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर त्याचे वडील व भाजीपाला मार्केट परिसरातील एका व्यावसायिकाने समलैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल रात्री उघडकीस आली. पीडित मुलाच्या आई च्या तक्रारीनुसार राजुरा पोलीस ठाणे येथे काल रात्री उशिरा (प्रातः सकाळी 3:30 ) वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपीस अटकेत घेतले आहे. 

पीडित मुलांनी तक्रारीत केलेल्या कथन नुसार सुरुवातीला  त्याचे वडील व सदर व्यापारी मुलाच्या घरीच वारंवार अत्याचार करायचे त्यानंतर आरोपी व्यापारी हा मुलाला त्याच्या व्यावसायिक गोडाऊन मध्ये नेऊन अत्याचार करायचा व कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे शारीरिक त्रास होत असला तरीही कुठेही वाच्चता केली नाही. 

परंतु 25 फेब्रुवारी ला पीडित ट्युशन क्लास वरून घरी जात असताना सदर व्यापाऱ्याने बोलावून गोडाऊन मध्ये नेले व आतून दार लावून कुकर्म केले असा त्याचा आरोप असून वृत्त लिहेपर्यंत अपराध क्रमांक 0160/2029 -भादंवि 377, 506 व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पोकसो ऍक्ट ) - 10, 3, 7, 6 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात येऊन पिडीतास वैद्यकीय तपासणीकरिता रवाना करण्यात आले होते. घटनेचा अधिक तपास राजुरा पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार नरेंद्र कोसूरकर करीत आहेत.