चंद्रपूर ब्रेकिंग : महाकाली मंदिर परिसरातून 11वर्षीय मुलगी बेपत्ता : मुलींना पळवून नेण्याऱ्या रॅकेटचा नुकताच पोलिसांनी केला होता पर्दाफाश : शहरातील पालकांमध्ये दहशत #humantraficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : महाकाली मंदिर परिसरातून 11वर्षीय मुलगी बेपत्ता : मुलींना पळवून नेण्याऱ्या रॅकेटचा नुकताच पोलिसांनी केला होता पर्दाफाश : शहरातील पालकांमध्ये दहशत #humantraficking

Share This
१० वर्षांपूर्वी बंगाली कॅम्प परिसरातून ११ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्यात आले होते. दशकाच्या संघर्षानंतर ही मुलगी कशीबशी चंद्रपुरात परतली. शहरात मुली पळवून नेणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पीडितेने दिली होती. या माहितीच्या आधारे चंद्रपूर पोलिसांनी हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा राज्यातून मुलींची विक्री करणारे रॅकेट शोधून काढले आहे.

खबरकट्टा / चंद्रपूर : 
शहरातील महाकाली मंदिर परिसरातून ११ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचे विशेष पथक मुलीचा शोध घेत आहे.

मुळचे नागपूरचे असलेले बळवंत मडावी कुटुंबासह महाकाली मंदिर परिसरात वास्तव्यास आहे. याच परिसरातून त्यांची मुलगी बेपत्ता झाली. लहान मुलींना पळवून नेण्याऱ्या रॅकेटचा नुकताच पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्यातच आता ही घटना समोर आल्याने शहरातील पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

चंद्रपूर शहरातील गरीब वस्तीतील लहान मुलींना पळवून नेऊन त्यांची विक्री केली जाते. या रॅकेटचा नुकताच पर्दाफाश चंद्रपूर पोलिसांनी केला. दहा वर्षांपूर्वी बंगाली कॅम्प परिसरातून अकरा वर्षे मुलीला गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्यात आले. 

तब्बल दहा वर्षाच्या संघर्षनंतर ही मुलगी कशीबशी चंद्रपूर आली. तिने आपली हकीकत सांगितली आणि सर्वानाच मोठा धक्का बसला. कारण शहरात मुली पळवून नेण्याचे एक रॅकेट सक्रिय असल्याचे तिने सांगितले. यामुळे चंद्रपूर पोलिसांनी याचा छडा लावत हरियाणा उत्तर प्रदेश तेलंगणा मध्ये मुलींची विक्री करणारे रॅकेट शोधून काढले. अशातच महाकाली मंदिर परिसरात मुलगी कालपासून गायब असल्याचे समजते. 

बळवंत मडावी हा मूळचा नागपूरचा मागील दोन महिन्यांपासून तो आपल्या कुटुंबासह महाकाली मंदिर परिसरात राहत होता. पत्नी, मुलगा आणी मुलगी त्याच्यासोबत राहत होते. काल बळवंतची 11 वर्षीय मुलगी महाकाली मंदिरात महाप्रसाद घेण्यासाठी गेली जी अजुन परतत आलेली नाही. याबाबत शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलीच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा देखील दाखल आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण संशयास्पद असून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.