एससी, एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती ! : अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची करणार तरतूद ! #obc #vijaywadettiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एससी, एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती ! : अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची करणार तरतूद ! #obc #vijaywadettiwar

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :


अनुसूचित जाती व जमाती (एससी, एसटी)च्या विद्यार्थ्यांप्रमाणे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना 100 टक्के शुल्क परताव्यासाठी शिष्यवृत्ती सरकार देणार आहे. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल अशी माहिती ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ओबीसी समाजातील शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती पाहता एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे शुल्कावर 100 टक्के शिष्यवृत्ती दिली जाते त्याच धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे असे सरकारचे धोरण आहे. सोबतच एससी व एसटीसाठी जे 1750 अभ्यासक्रम आहेत तेवढेच ओबीसी विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात येतील.

ओबीसी मंत्रालयाचे कामकाज क्षेत्रीय व जिल्हा स्तरावर लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठी 813 पदांच्या आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. एनटी (धनगर) प्रकर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन अशी एकूण 72 वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. ही वसतिगृहे सध्या भाडय़ाच्या जागेत सुरू करण्यात येत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांप्रमाणेच शैक्षणिक आरक्षणाचा फायदा देण्यासाठी धनगर समाजातील 7500 विद्यार्थ्यांना नामांकित शाळांच्या प्रवेश देण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.