दुचाकी- ट्रक अपघातात 1 युवक ठार तर एक गंभीर जखमी #roadaccident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दुचाकी- ट्रक अपघातात 1 युवक ठार तर एक गंभीर जखमी #roadaccident

Share This
खबरकट्टा / यवतमाळ -आर्थिक व्यापरिक मोठी बाजारपेठ आणि करखान्या प्रगतिच्या दिशेने वाटचाल करत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटंबन या तालुक्याच्या ठिकाणी मुख्य मार्गावर गुरुकुल शाळेजवळ आज  5 फेब्रुवारी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान एकमेका विरोधी येणाऱ्या भरधाव ट्रक व दुचाकी मध्ये जबर धडक बसून दुचाकीवरील एक युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याला  रुग्णवाहिकेने वणी येते हलवण्यात आलेले आहे. अपघात झाल्यावर घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीने वाहतूक ठप्प झाली असून अपघात परिसरातील जड वाहतुकीच्या नियोजनाची आवश्यकता आहे. 

अपघात करून ट्रक चालक भरधाव गाडी चालवत पळून गेला असून वृत्त लिहेपर्यंत मृत व गंभीर युवकाची ओळखसुद्धा पटलेली नाही.