1एप्रिल पासून वीज मीटर होणार प्रीपेड #electricmeter - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

1एप्रिल पासून वीज मीटर होणार प्रीपेड #electricmeter

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :वीजचोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार मोबाईलप्रमाणेच आता प्रत्येकाच्या घरातील वीज मीटरही प्रीपेड करणार आहे.1 एप्रिलपासून घरामध्ये प्रीपेड वीज मीटर लावणे बंधनकारक केले जाणार आहे.टप्प्याटप्प्याने जुने मीटर हटवण्यात येतील. त्याचप्रमाणे वीज पुरवठाही स्मार्ट मीटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वीजेचा दर निवडण्याचा पर्यायही ग्राहकाला असणार आहे.


2022 पर्यंत वीज मीटर प्रीपेड करण्याचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2020-21 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे घरामध्ये वीज हवी असल्यास रिचार्ज कराव लागणार, अन्यथा वीजपुरवठा बंद करण्यात येईल.हा उद्देश साध्य करण्यासाठी 22 हजार कोटींची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

वीज कंपन्यांचं होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रीपेड वीज मीटर लावणे बंधनकार करण्यात येणार आहे. साधारण 8 हजारांपासून ते 25 हजारांपर्यंत या प्रीपेड वीज मीटरची किंमत असणार आहे. या प्रीपेड वीज मीटरचा रिचार्ज मोबाईलद्वारे करता येणार आहे.