इको-प्रो 'अनुत्तम अभ्यासिका' (इको-प्रो शिक्षण विभाग चा उपक्रम): चंद्रपूर शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर 'अभ्यासिका' 1मार्च 2020 पासून होणार सुरू #eco-pro chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

इको-प्रो 'अनुत्तम अभ्यासिका' (इको-प्रो शिक्षण विभाग चा उपक्रम): चंद्रपूर शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर 'अभ्यासिका' 1मार्च 2020 पासून होणार सुरू #eco-pro chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
चंद्रपूर शहरातील इको प्रो संस्थेने आपल्या 15 वर्षाच्या सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रासह अन्य सेवेत विविध विषयांवर कार्य केले. आता एका नव्या व्यासपीठाकङे पादाक्रांत करीत असून, चांगला नागरिक घङविण्याच्या दृष्टीने इको-प्रो संस्थेच्या 'शिक्षण विभागा'च्या वतीने जिल्हयातील कानाकोपऱ्यातुन चंद्रपूर शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर  'अभ्यासिका' सुरू करीत आहेत. 
आज ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात शिकायला येत आहे. मात्र, शिकवणी वर्ग, निवास आणि भोजनाचा खर्च भागविताना आर्थिक बाबीचा सामना करावा लागतोय. अशातच खासगी अभ्यासिकांचा खर्चही मोठा आहे. त्यामुळे विद्यार्थी खचून जातो. अशा विद्यार्थ्याना धीर देण्यासाठी इको-प्रो ही संस्था अभ्यासिकेची सुविधा येत्या 1 मार्च 2020 पासून इको-प्रो कार्यालय, रामाला तलाव, गंजवार्ड व समाधी वार्ड, जेल रोड येथे उपलब्ध करून देत आहेत.

या उपक्रमाचा सर्व गरजु विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि आपली नोंदणी करावी अशी विनंती इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे व इको-प्रो शिक्षण विभाग प्रमुख रमेश मुलकलवार यांनी केली आहे. 

इको-प्रो 'अनुत्तम अभ्यासिका'

(इको-प्रो शिक्षण विभाग चा उपक्रम)

स्थळ: इको-प्रो कार्यालय, रामाला तलाव, गंजवार्ड व समाधी वार्ड, जेल रोड, चंद्रपूर. 

(...सदर पोस्ट गरजू विद्यार्थी पर्यंत पोहचविन्यास सहकार्य करा....)