खबरकट्टा /गडचिरोली : सिरोंचा
जिल्हा परिषद गडचिरोलीची आज दिनांक 16 जानेवारीला विषयी समितीच्यि सभापती पदाची निवडणूक होती. ते चारही सदस्य आज सकाळीच आपल्या वाहनाने गडचिरोली येतांना मोठा अपघात झाला त्यात चारही सदस्य गंभीर जखमी आहेत.
विविध सभापतींची निवडणूक होती त्यानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे चार जिल्हा परिषद सदस्य देवरीला गेले असता परत येताना जांबुळखेडा तालुका कुरखेडा येथील लेंडर इं नाल्याजवळ वळणावर ट्रकने धडक दिल्याने यावेळी जिल्हा परिषद सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.
या गंभीर झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये कुरखेडा कढोली जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान जी टेकाम ,वैरागड ,मानापुर जिल्हा येथील जिल्हा परिषद सदस्य श्री संपत्ती आडे, गुरुजी, विहीरगाव किन्हाळा जिल्हा परिषद सदस्य श्री रमाकांत ठेंगरी आणि गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य श्री सोनटक्के हे चारही जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे असून गंभीररित्या जखमी झालेले आहेत.
चारही जिल्हा परिषद सदस्यांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे.भाजपचे चार जिल्हा परिषद सदस्य अपघातात गंभीर जखमी झाल्याने विषय समिती सभापतीचे निवडणुकीला हजार राहतील कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.