खबरकट्टा / यवतमाळ : मुकुटबन -
मुकुटंबन येथील श्री.गजानन महाराज महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिराचा समारोह अडेगाव येथे संपन्न झाला.मागील वर्षांपासून या शिबिराचे आयोजन गावामध्ये संपन्न होऊन वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन शिबिरामध्ये केले जाते.या शिबिराचे उद्घाटन महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय घरोटे यांचा अध्यक्षतेखाली झाले.
या वेळी प्रमुख पाहुने म्हणून गावातले पोलिस पाटील अशोक उरकुडे तसेच जिल्हा परिषद शाळा च्या मुख्याध्यापिका सौ.चंदाताई बरशेट्टीवर यांच्या प्रामुख्याने उपस्थित होती.या शिबिरादरम्यान गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान ,जनजागृती मोहीम,गावकारयांची आरोग्य तपासणी व औषधीवाटप ,ग्रामदिंडी ,रक्तदाण यासारखे उपक्रम विध्यार्थीमार्फत राबविण्यात आले होते.
यानंतर दुपारच्या बौद्धिक सत्रात ग्रामगीताचार्य श्री.वैजनाथ खडसे यांनी "ग्रामगीता" ,आजच्या तरुण पिढि साठी प्रशांत गावंडे यांनी "स्पर्धा परीक्षा आजच्या काळाची गरज",प्रा.श्रीकांत पानघाटे यांनी "घनकचरा व्यवस्थापण",डॉ.हरगोविंद पालिवाल यांनी "योगासनांचे मानवी जीवनामध्ये महत्व",श्री.वासुदेव विधाते यांनी "जलयुक्त शिवार अभियान",श्री.मंगेश पचभाई यांनी "रक्तदाण बद्दल जनजागृती",डॉ.संजय जोगदंड यांनी"आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले,तसेच सभापती सौ.लताताई आत्राम यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले अश्या विविध विषयांवर पाहुण्यांनी सर्वाना मार्गदर्शन केलं.
सात दिवस चाललेल्या या शिबिर समारोपीय कार्यक्रमाला अडेगाव येथील सरपंच अरुण हिवरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सुभोध बांगडे तर प्रास्ताविक रासयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ.अनंता सूर तर आभार प्रदर्शन श्री.संजय बोधे यांनी मानले ,शिबीर यशस्वीतेसाठी डॉ.मालेकर, डॉ.आवारी, डॉ.मुडे,डॉ.चव्हाण ,प्रा.भालेराव ,प्रा.कु.ढेंगळे, सुभाष आगीलवर यांच्या प्रामुख्याने पुढाकार घेतला.तसेच गावातील जेष्ठ नागरिक व युवा पिढीचा मोठ्या संख्येने शिबिरामध्ये समावेश होता.