घुग्घूस नगरपरिषद परिषद घोषीत करा :- मा.पालकमंत्री विजय वड्डेटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांची ग्रामविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना संयुक्त मागणी #vijaywadettiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घुग्घूस नगरपरिषद परिषद घोषीत करा :- मा.पालकमंत्री विजय वड्डेटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांची ग्रामविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना संयुक्त मागणी #vijaywadettiwar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : घुग्घूस :- 

चंद्रपुर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या  घुग्घूस शहरातील ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्याकरिता मागील 20 वर्षा पासून घुग्घूसकर जनता लढा देत आहे.2011 च्या जनगणने नुसार 32654 इतकी लोकसंख्या असून आजघडिला ती 50000 च्या वर गेलेली असून वार्षिक उतपन्न 8 ते 10 कोटींच्या घरात आहे.मात्र अजुन पर्यंत घुग्घूस ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला नाही व नुकतेच घुग्घूस ग्रामपंचयतीचा वॉर्ड आरक्षण जाहिर करण्यात आले होते.

याची द्खल घेत खासदार बाळू धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा आढावा बैठकीत घुग्घूस नगरपरिषद घोषित करा अशी मागणी केली या मागणीला पाठिंबा दर्शवित मा.पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना घुग्घूस ग्रामपंचायतीचे वॉर्ड आरक्षण रद्द करण्याचे निर्देश दिले.

याच अनुषंगाने घुग्घूस नगरपरिशद लवकरात लवकर व्हावी याकरिता दिनांक 29 जानेवरी रोजी मा. मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या सह आमदार किशोर जोरगेवार , राजुरेड्डी घुग्घूस शहर अध्यक्ष यानी ग्रामविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांना सविस्तर माहिती देवून घुग्घूस नगरपतिषद् लवकरात लवकर घोषित करण्याची मागणी केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून लवकरात लवकर बैठक लावून हा विषय निकाली काढू असे आश्वासन दिले याप्रसंगी अशोक मत्ते, कामगार नेते सैय्यद अनवर उपस्थित होते.