ब्रेकींग : वाघाने घेतला आणखी एका गुराख्याचा बळी #tigerattack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकींग : वाघाने घेतला आणखी एका गुराख्याचा बळी #tigerattack

Share This
ब्रेकिंग :वाघाच्या हमल्यात इसम ठार #tigerattack

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 
              
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथून 5 की.मी.अंतरावरिल धानोरा या गावालगतच जंगलात जनावरे चारण्याकरीता नेणाऱ्या गुराखी संतोष खमोनकार वय 45 वर्षे यांना आज 12 वाजता वाघाने हल्ला करून ठार केले.
                    

वाघाने घेतला आणखी एका गुराख्याचा बळी :

राजुरा तालुक्यातील वाघाच्या दहशतीचे व बळी घेण्याचे सत्र काही केल्या संपत नाही आहे.नुकतीच राजुरा येथील इंदिरा नगर लगतच्या जंगलात सरपण गोळा करण्याकरीता गेलेल्या व्यक्तीला वाघाने ठार केल्याची घटना ताजी असत्तांनाच आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान संतोष गणपत खामणकर वय 32 रा.धाणोरा येथील गुराख्यांवर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला.

प्राप्त माहितीनुसार म्रूतक संतोष खामणकर हा आपल्या एका सहकार्यासोबत गुरे चारण्याकरीता विरुर वनपरीक्षेत्रातील कविटपेठ कक्ष क्रमांक 137 धानोरा गावालगतच्या वनात गुरे चरायला नेले असता तेथे दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला आणि जागीच संतोष चा जीव गेला.सोबत असलेल्या सहकार्याने घटणास्थळावरून पळ काढत गाँव गाठले व गावकरयाँना घडलेला सर्व प्रकार सांगितला. 

तात्काळ गावकर्यांनि व वनवीभागाच्या अधिकारी व कर्मचार्याँनि घटणास्थळ गाठले. संतोष चा म्रूत्देह सोडून वाघाने तोपर्यंत तेथून पळ काढला होता.
या घटनेमुळे राजुरा तालुक्यांतील वनालगतच्या गावांमध्ये व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या रक्ताळलेल्या वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याची ही चौथी घटना असल्याने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. खांबाळा येथे झाडनिच्या काळ्या गोळा करायला गेलेल्या महीलेवर वाघाने हल्ला करत तिला जागीच ठार केले. मूर्ति येथील साळवे नामक शेतकऱ्यांला त्याच्याच शेतात ठार केले. राजुरा येथील इंदिरा नगर वार्डलगतच्या जंगलात कोडापे नामक सरपण गोळा करणाऱ्या युवकालाही अत्यंत निर्घूनपणे वाघाने ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आज धानोरा गावातील संतोष खामणकर या गुराख्यांचा वाघाने बळी घेतला. 

तसेच वाघाच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्याच्या संख्येतही वाढ होत असल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे.सध्या पावसाने शेतकऱ्यांना झोडपले तसेच वाघाच्या भीतीने रात्रौला शेतात जागली करीता कोणीही जायला तयार नसल्याने शेतकर्यांची उभी पीक जंगली डुकर व अन्य प्राणी नासधूस करीत आहे. आपल्या शेतातिल होणारे नुकसान उघड्या डोळ्यांनी बघण्या पलीकडे शेतकर्याकडे पर्याय उरलेला नाही.त्यामुळे निसर्गाची अवक्रूपा व वन्य प्राणांच्या भीतीने शेतकरी हवालदिल झालेले आहे.

किमान वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली असल्याने वनवीभाग नेमके काय उपाययोजना करते याकडे नागरिकांस शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. उपविभागीय वनअधिकारी अमोल गर्कल यांच्यासह अन्य वन्यकर्मचारीनी घटणास्थळ गाठले आणि घटनेचा तपास वीरुर वनपरीक्षेत्र अधिकारी करीत आहे.