चंद्रपूर ब्रेकिंग : वाघ-बिबट्याची शिकार करणाऱ्या तिघांना अटक : वन्यप्राण्यांच्या शिकारीतील हाडे जप्त #tiger - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : वाघ-बिबट्याची शिकार करणाऱ्या तिघांना अटक : वन्यप्राण्यांच्या शिकारीतील हाडे जप्त #tiger

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


चंद्रपूर वनविभागातील  सावली परिक्षेत्रा अंतर्गत असलेल्या मौजा कापसी गावाजवळील वन विभागाच्या कक्ष क्रमांक 201 मधील 11 केवी विद्युत तारेद्वारे करंट लावून वन्यप्राणी रानडुक्कर व वन्य प्राणी वाघ किंवा बिबट्याची शिकार केल्याचे गोपनीय माहिती मिळताच, चंद्रपूर वनविभागातील चमूने अजय भोजराज मेश्राम,सुरेश विठ्ठल गेडाम,रमेश श्रीरंग भोयर या आरोपींना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान वन्यप्राण्यांचे हाड जप्त केले. सदर वन्यप्राणी हा वाघ किंवा बिबट आहे. याचा तपास सुरू असून, वरील तीनही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम- 1972 अंतर्गत वनगुन्हा नोंदविला आहे. तसेच,तिनही आरोपींना दिनांक 27 जानेवारी 2020 रोजी  न्यायदंडाधिकारी वर्ग-1, सावली न्यायालयात हजर केले असता आरोपी अजय भोजराज मेश्राम, सुरेश विठ्ठल गेडाम व रमेश श्रीरंग भोयर यांना दिनांक 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

पुढील चौकशीमध्ये दिनांक 28 जानेवारी 2020 रोजी मौजा हळदगाव ता.समुद्रपूर जिल्हा वर्धा येथून आरोपी संजय विठ्ठल गेडाम यांचेकडून वन्यप्राण्याचा 1 पंजा व मिशी 12 नग हस्तगत करण्यात आले. दिनांक 29 जानेवारी  2020 रोजी मा.न्यायदंडाधिकारी वर्ग-1, सावली न्यायालयात संजय विठ्ठल गेडाम व बंडू नारायण गेडाम यांना हजर केले असता त्यांना दिनांक 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.


सदर वनगुन्ह्याचा पुढील तपास विभागीय वन अधिकारी ए. एल. सोनकुसरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) एस. एल .लखमावाड व वनपरिक्षेत्र अधिकारी सावली जी.व्ही.धाडे हे करीत आहेत.