ताडोबा अभयारण्यात फिरायला आलेल्या महिला पर्यटकाचा टायगर किंग रिसोर्ट मध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू #tadoba - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ताडोबा अभयारण्यात फिरायला आलेल्या महिला पर्यटकाचा टायगर किंग रिसोर्ट मध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू #tadoba

Share This
प्रथमच घडली अशी घटना  :  घटनामासळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार मिळाले असते तर त्या महिलेचे प्राण वाचले असते. 

खबरकट्टा /चंद्रपूर : चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )

चिमूर : - ताडोबा अभयारण्यात येत असलेल्या कोलारा येथिल टायगर किंग रिसोर्ट मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुणे येथील ३ महिला मैत्रिणी जंगल सफारी करीता आल्या होत्या त्यांनी दिनांक.३१/१२/२०१९ ते ०१/०१/२०२० असे एकूण २ दिवस जंगल सफारी चा आनंद लुटून तिसऱ्या दिवशी परतीच्या वेळेस सकाळी १०:३० वाजता च्या सुमारास वॉशरूम मध्ये जाऊन आंघोळ करीत भरपूर वेळ ती महिला बाहेर का आली नाही. 


म्हणून मैत्रिणी ओरडू लागल्या व मॅनेजर तात्काळ धावून गेल्यानंतर दाराला झटका मारून दार उघडले बघितले कि ती महिला पडलेल्या अवस्थेत तेव्हा महिलेचा स्वासोस्वास सुरू होता. त्या दिपाली मितीलेश जटार वय ४८ वर्षे या महिलेला सर्वप्रथम मासळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले व त्या महिलेचे पल्स फार कमी होत असल्याने त्या महिलेला उप जिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. त्यानंतर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेत असतांनाच मृत्यू झाल्याची घटना घडली उप जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितले कि हा मेजर हार्ड अटॅक मुळे मृत्यू झाला व त्या महिलेच्या पतीने सांगितले कि हा तिसरा अटॅक आहे. व ती महिला हि अगोदर पासून BP ची पेशन्ट होती. हि घटना ताडोबा अभयारण्य जंगल सफारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाचं घडली आहे. ३ मैत्रिणी २ दिवसीय जंगल सफारी करून परतीच्या वेळेस अखेर एका मैत्रिणीचा जीव गेला याची चर्चा संपूर्ण चिमूर तालुक्यात सुरू असून वन्य प्राणी बघायला जात असतांना तब्बेतीची काळजी घेऊन वन्य प्राण्यांचे दर्शन घ्यायला हवे अशा चर्चांना सुद्धा वेग आला आहे.