देशभक्तीपर गीतांनी नागरिक मंत्रमुग्ध : शिवसेनेतर्फे 'एक श्याम देश के नाम' कार्यक्रम #sumanthakre - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

देशभक्तीपर गीतांनी नागरिक मंत्रमुग्ध : शिवसेनेतर्फे 'एक श्याम देश के नाम' कार्यक्रम #sumanthakre

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

         

ये मेरे वतन के लोगो, मेरा कर्मा है याहून एकापेक्षा एक सरस गीते गाऊन कलाकरांनी नागरिकांना रिझवले. शिवसेनेच्या जटपुरागेट शाखेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त एक श्याम देश के नाम हा देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम रामनगर येथील दवाबाजार परिसरात पार पडला. हजारो नागरिकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.


शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख रमेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे होते. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे,भाविसे माजी जिल्हाप्रमुख दीपक बेले, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेश नायडू, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुखजयदीप रोडे, शिवसेनेचेमाजी शहरप्रमुख मनोज पाल, कौशिक धावडा, हनुमान मंदिर तेली समाजाचे अध्यक्ष शंकरराव रघाताटे,समाजसेवक नंदूमामा मोगरे, नगरसेवक
प्रदीप देशमुख, तैलिक युवा एल्गार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र इटनकर,माजी नगरसेवक रावजी चवरे, प्रभूदास तेलमासरे, ज्येष्ठ समाजसेविका सुमन उमाटे, माजी नगरसेविका रत्नमाला बावणे, चंदा इटनकर, उज्ज्वला येरणे,कल्पना शिंदे यांची उपस्थिती होती. 
नील सुमन ठाकरे आणि संचाने एकापेक्षा एक सुंदर अशी देशभक्तीपर गीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. आयोजन शिवसेनेच्या जटपुरागेट शाखेने केले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माजी नगरसेवक आकाश साखरकर होते.आयोजनाकरिता निखिल शेंडे, सोनू अगडे, सुरेंद्र तेलमासरे, हर्षल शिंदे,विशाल कामडी, नरेश उमाटे, अनुपबेले, नितीन वैरागडे, कुणाल तेलमासरे,आकाश चवरे, गौरव तेलमासरे, शुभम जयपूरकर यांनी सहकार्य केले.