चंद्रपुर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी गुजरात च्या अभ्यास दौऱ्यावर #sthanikswaraksanstha - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी गुजरात च्या अभ्यास दौऱ्यावर #sthanikswaraksanstha

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासन व यशदा , पुणे च्या संयुक्त विद्यमाने विविध राज्यातील उत्कृष्ट योजना , चांगली कामे व उपक्रम यांचा अभ्यास करण्याकरीता नागपुर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींसाठी आयोजित गुजरात राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी ६० जण यशदा च्या  समन्वयक श्रीमती स्नेहा देव यांच्यासह सहभागी झाले आहेत.     
या अभ्यास दौऱ्यात चंद्रपुर जिल्ह्यातुन १३ लोकप्रतिनिधी व एक समन्वयक अधिकारी असे १४ जण रवाना झाले आहेत . यात जि.प.गटातुन संजय गजपुरे , अॅड.हरिष गेडाम, गौतम निमगडे, अॅड.दिपालीताई मेश्राम, पं.स.सभापती गटातुन गोविंदा पोडे, दिपक सातपुते , सौ.रोहिणीताई देवतळे, सौ.विद्याताई कांबळे,सौ. छायाताई शेंडे , सरपंच गटातुन भालचंद्र बोदलकर, धनराज बुरांडे, सौ.मंगलाताई सातपुते, सौ.करुणाताई उराडे  व पं.स. मुलचे संवर्ग विकास अधिकारी कपीलनाथ कलोडे हे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत .
    
गुजरात राज्यातील काही जिल्हापरिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील नाविण्यपुर्ण योजना , ई ग्राम योजना , चालणारे कामकाज यांची प्रत्यक्ष माहिती या दौऱ्यात घेतली जाणार आहे. या सोबतच गुजरात , विधानसभा , सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अमुल डेअरी व विविध बचत गटांना या दरम्यान भेटी दिल्या जाणार आहेत.