खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा वरूर रोड येथे गेल्या विस वर्षापासून सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनी आहे.सदरच्या कोल माईन्स मध्ये कोळसा उत्खनन करीता बारुद बनविल्या जाते.यात कामगारांची सातत्याने पिळवणुक, अपमानास्पद वागणूक,सुधारित किमान वेतन,पेमेन्ट स्लिप,हजेरी कार्ड,व ओटी यासारख्या इतर गंभीर बाबी मुळे येथील शेकडो कामगारांनी सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात दि.०४/०१/२०२० पासून बंद पुकारला होता.
कंपनी व्यवस्थापनाने साम, दाम, दंड,भेद या सर्वांचा वापर करूनही आंदोलन मागे घेऊ शकले नाही.व सदर गंभीर प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे प्रस्थापित झाले व आज दि.२४/०१/२०२० ला माननीय सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी कंपनी व्यवस्थापन कामगारांवर यानंतर अन्याय झाल्यास नियमानुसार कायदेशिर कार्यवाही करू असे खडेबोल दिल्याबरोबर कंपनी व्यवस्थापनाने लगेच कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या त्यामुळे समस्त कामगारात उत्साहाचे वातावरण झाले.
यावेळी जयभवाणी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे,ब्लॅक पँथर ग्रुपचे अध्यक्ष विजय चन्ने,निखिल बजाईत,भूपेंद्र साठोने, संदिप निमकर,प्रदिप बोरकुटे,गणेश लोखंडे,अरविंद वडस्कर,लक्ष्मीकांत जाधव व समस्त कामगार उपस्थित होते.