-लग्नाच्या स्वागत समारंभाच्या दिवशी विहिरगाव वाचनालयस ३ हजाराची पुस्तके दिली भेट.
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील नवदांपत्य स्नेहा व वैभव वनकर यांनी समाजासमोर एक नवा पायंडा, नवा आदर्श निर्माण केला आहे.
ते म्हणजे दिनांक २९/१२/२०१९ ला स्नेह व वैभव वनकर यांचा शुभ विवाह होता. त्या निमित्त दिनांक ३०/१२/२०१९ ला स्वागत समारोह ठेवण्यात आला होता. याच दिवशी नवीन दाम्पत्य कडून ग्राम पंचायत विहिरगाव येथील वाचनालय ला ३ हजार रुपये किमतीचे पुस्तके वितरित करण्यात आली.
आपण या गावात शिकून गावात मोठे झालो व बँकेमध्ये मॅनेजर या पदावर रुजू झालो आहे. आपल्या जीवनक्रमनात गावाचे, गावातील जनमानसाचे काही ना काही योगदान आहे याची जाणीव त्यांना आहे. गावातील मुले शिक्षण मोठी व्हावीत. वाचणालयातील पुस्तके वाचून, आभास करून त्यांनी प्रगती करावी अशी भूमिका ठेवून त्यांनी हे सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या या नव्या संकल्पनेने समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे तर अनेकांकडून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.