चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुख्यामंत्र्यांच्या महत्वकांक्षी "शिवभोजन" योजनेला सुरुवात : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते थाळी देऊन शुभारंभ #shivbhojan - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुख्यामंत्र्यांच्या महत्वकांक्षी "शिवभोजन" योजनेला सुरुवात : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते थाळी देऊन शुभारंभ #shivbhojan

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर, दि.26 जानेवारी : 


राज्य शासनाची गरीब, गरजू व्यक्तीसाठी सवलतीच्या दरात भोजन देण्याची योजना अर्थात शिव भोजन योजना चंद्रपूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाला सुरू करण्यात आली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः थाळी देऊन या योजनेचा शुभारंभ केला.ध्वजारोहणानंतर बस स्टॅन्ड परिसरातील या शिवभोजन योजनेला सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार सुरेश धानोरकर ,आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बस स्टँड परिसर, गंज वार्ड भाजीपाला बाजार, जिल्हा सामान्य रुग्णालय या तीन ठिकाणी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सध्या जिल्हास्तरावर प्रायोगिक स्तरावर ही योजना राबविण्यात येत असून पुढील काळात तालुका व ग्रामीण स्तरावर देखील ही योजना राबविली जाणार आहे.