-जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर ह्या संस्थेवर बंदी आणून योग्य प्रशासक नेमण्याची राजू झोडे यांनी केली मागणी.
खबरकट्टा / चंद्रपूर :
जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापुर द्वारा संचालित खेमाजीनाईक माध्यमिक आश्रम शाळा पिटीगुडा येथील अधीक्षकाने दिनांक 25 डिसेंबर 2019 ला संस्थापक, सहाय्यक आयुक्त, व माध्यमिक व प्राथमिक मुख्याध्यापक व एक शिक्षक यांच्या जाचाला कंटाळून शाळेला लागून असलेल्या निवास्थानातच फाशी लागून आत्महत्या केली.
सदर घटनेचे आरोपी बाबूलाल काशीराम पवार हे संस्थाचालक तुकाराम पवार यांच्या पिटीगुडा या शाळेवर मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. आरोपी बाबूलाल पवार हे व सहकारी शिक्षक निखिल पवार व संस्थापक तुकाराम पवार यांनी मयत सुभाष पवार यांना सुरुवातीपासूनच आर्थिक व मानसिक त्रास नेहमी देत होते. मागील सहा महिन्यापासून त्यांचे वेतन रोखण्यात आले होते.
शाळेत कार्यरत असताना सदर अधीक्षकाला कोणत्या ना कोणत्या कारणाने विनाकारण त्रास दिल्या जात होता याबाबत त्यांनी संस्थेकडे सुद्धा बोलले होते परंतु संस्थापकाने मयत अधीक्षक आलाच दमदाटी केली होती त्यामुळे मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून सुभाष पवार यांनी गळफास लावून आपले जीवन संपविले परंतु त्यांनी सदर संस्थाचालक ,मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या बद्दल चिठ्ठी लिहून ठेवली. सदर घटनेला संस्थाचालक ,मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदार असल्याचे आढळले.
आरोपी बाबूलाल पवार यांनी 1997 ते 2000 पर्यंत शिवाजी कॉलेज राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे पदवी शिक्षण घेतले होते आणि त्याच काळात त्यांनी नोकरी सुद्धा करून वेतन उचलल्याचे आढळून आले ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित होऊच शकत नाही यामध्ये समाज कल्याण अधिकारी संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी शासनाची दिशाभूल करून खोट्या सह्या मारून लाखो रुपयाची अनुदान लाटले.
यात संस्थाचालक तुकाराम पवार समाज कल्याण अधिकारी तसेच मुख्याध्यापक दोषी असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी तसेच मयत सुभाष पवार यांच्या परिवाराच्या संपूर्ण मागण्या मान्य करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी जिल्ह्यातील नेते राजू झोडे यांनी परिवाराला भेट देऊन व निवेदन देऊन केली.
जर तात्काळ आरोपींना अटक करून सदर संस्था बंद केली नाही तर याबाबत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजू झोडे व कार्यकर्त्यांनी दिला. निवेदन देताना राजू झोडे ,संपत कोरडे किशोर ,पोतनवार ,अन्वर मिर्झा,भूषण पेटकर, गुरु कामटे ,अनिरुप पाटिल आदि कार्यकर्ते उपस्थित होते.