राजुरा - मुमताज जावेद, कोरपना- रूपालीताई तोडासे तर जिवती - अंजना पवार यांची पंचायत समिती सभापतीपदी निवड #rajuravidhansabha - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा - मुमताज जावेद, कोरपना- रूपालीताई तोडासे तर जिवती - अंजना पवार यांची पंचायत समिती सभापतीपदी निवड #rajuravidhansabha

Share This
 • राजुरा, कोरपना आणि जिवती पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा.
 • आमदार सुभाष धोटेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची विजयी घोडदौड.
खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा-शोएब शेख 
काल 1 जानेवारी ला झालेल्या राजुरा, कोरपना आणि जिवती पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणूकीत काँग्रेस पक्षाने आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली विजयी घोडदौड कायम ठेवली असून तीनही ठिकाणी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे.
        
राजुरा पंचायत समिती सभापती सभापतीपदी काँग्रेसच्या सौ. मुमताज अब्दुल जावेद यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसचे मंगेश गुरनुले यांची निवड करण्यात आली आहे. कोरपना पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या रूपालीताई तोडासे यांची तर उपसभापती काँग्रेसच्या सिंधुताई आस्वले यांची निवड करण्यात आली आहे. तर जिवती पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या अंजना पवार यांची निवड करण्यात आली आहे. 

        
राजुरा, कोरपना आणि जिवती येथील काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या विजयाबद्दल आमदार सुभाषभाऊ धोटे, ता. काँ. क. अध्यक्ष दादा पाटील लांडे, नगराध्यक्ष अरुनभाऊ धोटे, जेष्ठ नेते अब्दुल अमीद अब्दुल गणी,  जेष्ठ नेते श्रीधरपाटील गोडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, श्रीमती मेघाताई नलगे, जि प सदस्य, डॉ नामदेवराव करमनकर, जि प सदस्य, माजी सभापती सौ. कुंदा जेनेकर, सुनिल देशपांडे, उपनगराध्यक्ष, दिनकरराव कर्णेवार, अध्यक्ष सेवादल, साईनाथ बतकमवार, तुकाराम गुरणुले प स सदस्य, रामदास पुसाम प स सदस्य, नंदुभाऊ वाढई, शंकर बोकुर, गटविकास अधिकारी बी एस पाचपाटील ,सहायक गट विकास अधिकारी डी बैलमवार उपस्थित होते.माजी सभापती तथा पं. स. सदस्य शामबाबू  रणदिवे, माजी उपसभापती तथा सदस्य संभाजी कोवे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, सुरेश मालेकर, अभय मुनोत, उपसरपंच उमेश राजूरकर, घनश्याम नांदेकर, हारून सिद्दिकी, अशपाक शेख नगर उपाध्यक्ष जिवती, प्रा. सुग्रीव गोतावळे, माजी उपसभापती जिवती, शेख अब्बास अली, सय्यद रसूल, गोपाळ कासले, पांडुरंग पवार, रोशन आस्वले, मिलिंद ताकसांंडेे, असिफ सय्यद, विलास मडावी यासह काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्ये, काँग्रेसप्रेमी नागरिक यांनी अभिनंदन केले आहे.