विद्यार्थीचा सर्वांगीण विकास करणारी स्कॉउट-गाईड चळवळ - बादल बेले : आदर्श शाळेत लॉर्ड बेडेन पॉवेल यांची पुण्यतिथी साजरी #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विद्यार्थीचा सर्वांगीण विकास करणारी स्कॉउट-गाईड चळवळ - बादल बेले : आदर्श शाळेत लॉर्ड बेडेन पॉवेल यांची पुण्यतिथी साजरी #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


स्कॉउट गाईड चळवळ क्रीडाद्वारे शिक्षण देणारी ,बालकांचा शैक्षणिक ,शारीरिक ,मानसिक व नैतिक विकास घडविणारी संस्कार प्रक्रिया आहे. धकाधकीच्या व बदलत्या परिस्थितीत जे सामाजिक व व्यवहारदयान आपण घरी मुलामुलींना देऊ शकत नाही ते या शिक्षणातून त्यांना मिळते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष बादल बेले यांनी केले. 


आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर,राजुरा येथील स्कॉउट-गाईड व कब -बुलबुल यूनिटच्या वतीने स्कॉउट-गाईड चळवळीचे जनक लॉर्ड रॉबर्ट स्टीफनसन स्मिथ बेडेन पॉवेल यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक बादल बेले यांची उपस्थिती होती.तर प्रमुख अतिथि म्हणून आदर्श शाळेच्या जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, स्कॉउट यूनिट लिडर रुपेश चिड़े, गाईड यूनिट लिडर सुनीता कोरडे, कब -बुलबुल यूनिट लिडर रोशनी कांबले, अर्चना मारोटकर आदिंचि प्रामुख्याने उपस्थितती होती. सर्वप्रथम लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतीमेला माल्यार्पन केले.व प्राथणा गायन केले. स्कॉउट-गाईड शिक्षण शाळेच्या चार भिंतीत मर्यादित खोल्यातून दिले जाते असे नाही ,तर वनसंचार, वननिवास या द्वारे निसर्गाच्या स्वच्छ व खुल्या वातावरणात या विषयाचा खरा अभ्यास होतो. 


कमीतकमी साधनसामग्रीत अधिकाधिक सुविधा कश्या निर्माण करता येतील या सर्व गोष्टी  स्कॉउट-गाईड शिक्षणातूनच शिकायला मिळतात.असे प्रतिपादन प्रमुख अतिथि सारीपुत्र जांभूळकर यानी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बाजगीर व समीर वांढरे प्रास्तावीक स्कॉउट यूनिट लिडर रुपेश चिड़े, यांनी केले. आभार प्रदर्शन तन्मय पिंपळकर या विध्यार्थीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आदर्श शाळेतील स्कॉउट-गाईड ,कब -बुलबुल यूनिटच्या सर्व विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.