युवक-युवतींनी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा : रविंद्र होळी #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

युवक-युवतींनी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा : रविंद्र होळी #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत शेतकरी सुशिक्षित बेरोजगार उद्योग व्यवसाय अभिरुची ठेवणाऱ्या तरुणांचा व महिलांचा मेळावा चांदा ते बांदा योजनेअंतर्गत राजूरा येथे तहसिल कार्यालयात २९ जानेवारीला पार पडला.


चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये व तालुक्यात विविध कार्यक्रम मेळावे आयोजित करण्यात येत आहे जिल्हा प्रशासन अंतर्गत येणाऱ्या चांदा ते बांदा जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर मार्फत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे झाले असून शेतीला सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात अधिकाधिक उत्पन्न शेतकऱ्यांनी घ्यावे असे मार्गदर्शन जल अभ्यासक संजय वैद्य यांनी केले. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. 
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक कृषी विस्तार अधिकारी नरेंद्र पेठकर, विस्तार अधिकारी अमित महाजनवार, कृषी सहाय्यक संदीप दातारकर, आत्मा विभागाचे चंदनबटवे, व्यवस्थापक मा.वि.म प्रवीण बावणे, बांबू हॅंडीक्राफ्ट अँड आर्ट युनिट च्या मार्गदर्शिका सुनिता मोकाशे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.


शेतीला जोडधंद्याची जोड देण्यात यावी तसेच शेतीही बारामाही व्हावी सोबतच या योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या संधी व त्यातून गावपातळीवर निर्माण होणारे रोजगार, व्यवसाय प्रकल्पाला मिळणारी चालना व नवीन प्रकल्पाला मिळणारी मदत याचा पुरेपूर लाभ घेता येईल. गावपातळीवर पशुसखी व पशुमित्र यांच्या माध्यमातून राजुरा तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीमध्ये चांदा ते बांदा या योजनेची माहिती पोहोचविल्या जाईल. असे आवाहन गट विकास अधिकारी डॉ.ओमप्रसाद रामावत यांनी यावेळी उपस्थितांना केले. 


चांदा ते बांदा ही योजना तळा-गळात पोहोचावी यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांचेकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मार्गदर्शन मेळावे आयोजित केले जात आहे. त्यामुळे शेतकरी सुशिक्षित बेरोजगार व बचत गटातील महिलांना या योजनेतून मिळणारे लाभ व या योजनेची माहिती मिळणे सोपे झाले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाचे हे कार्य उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  जिल्हा माहिती कार्यालयाचे सुधीर आत्राम, नामदेव शेवाळे, सुभाष नगारे, यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मेकर्तीवार तर आभार विजय जाधव यांनी केले.