"शिवाजी आश्रम शाळेत स्वच्छता जनजागृती या संकल्पनेवर राज्यस्तरीय शिबीर" #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"शिवाजी आश्रम शाळेत स्वच्छता जनजागृती या संकल्पनेवर राज्यस्तरीय शिबीर" #rajura

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर -
      
सुब्बई येथील शिवाजी आश्रमशा

ळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे  "स्वछता जनजागृती " या संकल्पनेवर आधारीत  राज्यस्तरीय  शिबीर नुकतेच उत्साहात संपन्न झाले.महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण राष्ट्रीय सेवा योजना कक्ष , मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय  सेवा योजना कक्ष व  आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा , राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
     
या शिबीराचे उद्घाटन राजुरा तहसिलचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे उपाध्यक्ष श्री श्रीधरराव गोडे उपस्थित होते. तसेच या उद्घाटन कार्यक्रमास या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. नरेश मडावी, शिवाजी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री दादाजी झाडे तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
      
या शिबीरात महाराष्ट्र राज्यातील मुंबई विद्यापीठ मुंबई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठ जळगांव, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, एकुण २७७ विध्यार्थी व वेगवेगळ्या विद्यापीठांचे ३ प्राध्यापक संघनायक असे एकूण २८० जनांनी  सहभाग घेतला होता.
     
रॅली, पथनाट्ये, श्रमदानातून स्वछता च्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देने व स्वच्छ भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान  सहभागी विध्यार्थ्यांना  प्रबोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे हा या राज्यस्तरीय शिबीराचा प्रमुख उद्देश होता.
 खेळ, कवायत व योग साधनेसोबतच सुदृढतेचे धडे देणे व सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान प्रभोधनाच्या माध्यमातून सहभागी विध्यार्थ्यांनपर्यन्त पोहचवणे यासाठी रोज सकाळी योगनृत्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
       
या शिबीरात प्रभोधनाच्या सत्रात सहभागी विद्यार्थाना, पाणी फाउंडेशन चे श्री मिलिंद गड्डमवार यांनी "जलसंवर्धन काळाची गरज", गोविंदराव मूनघाटे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी "ग्राम स्वच्छता आमी युवाशक्ती", राजुरा न्यायालयाचे न्यायाधीश मा. एम. एम. कल्याणकर, व मा. एस. जी. गोरे यांनी "कायदेविषयक मार्गदर्शन",राजुरा येथील उपविभागीय वन अधिकारी मा. अमोल गर्कल यांनी "जैवविविधतेचा ऱ्हास आणि शाश्वत विकास", शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण येरमे व डॉ. शारदा टेकाम यांनी "आरोग्य विषयक समस्या आणि समुपदेशन"श्री दिलीप सोळंकी यांनी "एकविसाव्या शतकातील युवकांसमोरील आव्हाने व उपाय", कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. सोनाली लोखंडे यांनी "शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन", डेंनीयलसन डिग्री कॉलेज छिंदवाडा,(म.प्र.) येथील प्रा. रविंद्र नाफडे यांनी "राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे राष्ट्रनिर्मितीत योगदान", चंद्रपूर मुख्यालय येथील पोलीस उपअधीक्षक मा. शेखर देशमुख यांनी "रस्ते सुरक्षा व सायबर क्राईम",आदी विषयावर प्रबोधनपर व्याख्याने देवून सहभागी विध्यार्थ्यांनपर्यंत वरील विषयांचे ज्ञान पोहचवले.

    
या शिबीरात श्रमदानाच्या सत्रात सुब्बई येथून एक किलोमीटर दूरवर असलेल्या दोन नाल्यावर जलसंधारणासाठी दोन बंधारे, शिवाजी आश्रमशाळा परिसरात शोषखड्ड्याची निर्मिती, रास्ता खोदून तिथे सिमेंट पाईप टाकून रस्ता बनविणे, ग्रामस्वच्छता आदी कामे करण्यात आली.
       
या शिबिरात विविध विद्यापीठातील सहभागी विध्यार्थ्यांनी गावात फेरी काढून  शेतकरी आत्महत्या, एड्स जनजागृती, मतदान जनजागृती, स्वच्छ भारत अभियान, हागणदारीमुक्त गाव, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन,बेकारी निर्मूलन, स्त्री -भ्रुण हत्या, सुदृढ भारत समृध्द भारत आदी विषयांवर पथनाट्य सादर केली, व गावात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
     
हे शिबीर स्वच्छता जनजागृती या संकल्पनेवर आधारीत असल्यानेया शिबीरात सहभागी विध्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता, ग्रामस्वच्छता करून स्वच्छतेचे धडे नागरिकांना दिलेत.  डॉ. आनंद रायपुरे  यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधनेचे आवश्यक असणारे धडे योगनृत्याच्या अनुभवातून घेतले.
       
" एक भारत श्रेष्ठ भारत" या संकल्पनेला अनुसरून या शिबिरात  ओडीसा राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित पाहुण्यांचे मन जिंकलीत.ओडीसा राज्यातील संस्कृतीचा झालेला सांस्कृतिक कार्यक्रम हे या शिबिराचे खास वैशिष्ट्य ठरले.
  
या शिबिराच्या मनोरंजनाच्या सत्रात सहभागी विध्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या, एड्स जनजागृती, मतदान जनजागृती, बेकारी निर्मूलन, स्त्री -भ्रुण हत्या, स्वच्छता अभियान, सुदृढ भारत समृध्द भारत, एक भारत श्रेष्ठ भारत आदी विषयांवर पथनाट्य सादर केली. सहभागी विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचे मनोरंजन केले.
     
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालक , समन्वयकाच्या मार्गदर्शनाने  संघ नायक सहभागी झाले होते. या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.या मध्ये डॉ. दिलीप पाटील, प्रा. नितीन नन्नावरे, प्रा दुर्गा चाटसे आदींचा  समावेश होता. तसेच  शिबीर आयोजक महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीववृंद ,शिवाजी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारीवृंद, सुब्बई येथील सरपंच व सदस्य आदींचा समावेश आहे.
     
शिबिराचा समारोप संस्थेचे ज्येष्ठ संचालिका श्रीमती सुमनताई मामुलकर यांच्या अध्यक्षतेखाली व गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, गोंडवाना विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. नरेश मडावी, गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपुर जिल्हा समन्वयक  डॉ. विजया गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. समारोप कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते शिबीरात सहभागी झालेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.


शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, डॉ. सारिका साबळे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. चेतना भोंगाडे, प्रा. विठ्ठल आत्राम, सहाय्यक समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र मुद्दमवार, डॉ. आनंद रायपुरे, प्रा. सुवर्णा नलगे, प्रा. युवराज जांभुळकर  सोबतच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.