खबरकट्टा / चंद्रपूर :
क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले जयंती नीमीत्य " लेक वाचवा लेक शिकवा " अभीयानाअंतर्गत आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल ,राजुरा येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात रांगोळी स्पर्धेत सहभागी विध्यार्थीनी सुंदर रांगोळी काढून लेक वाचवा लेक शिकवा ,स्त्री भ्रूणहत्या , स्त्री -पुरुष समानता या विषयांवर रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला. विध्यार्थी नी काढलेल्या रांगोळीना पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी पारितोषिक देऊन त्यांचे अभिनंदन केले.