२०२१ ला होणाऱ्या जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचे काॅलम समाविष्ट करण्याबाबतचा ठराव जिल्हा परिषद , चंद्रपुरच्या आगामी सर्वसाधारण सभेत घेण्यात यावा जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचेतर्फे जि.प.अध्यक्षांना निवेदन #obc - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

२०२१ ला होणाऱ्या जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचे काॅलम समाविष्ट करण्याबाबतचा ठराव जिल्हा परिषद , चंद्रपुरच्या आगामी सर्वसाधारण सभेत घेण्यात यावा जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचेतर्फे जि.प.अध्यक्षांना निवेदन #obc

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -

  
शासनातर्फे २०२१ मध्ये जनगणनेचे काम सुरु होणार आहे.या जनगणनेत जाती निहाय व धर्मनिहाय तसेच विविध गोष्टींची गणना केल्या जाणार आहे. 
    
सदर होणाऱ्या जनगणनेत विविध जातीचे व प्रवर्ग निहाय काॅलम नमुद केल्या गेलेल्या आहेत .परंतु ओबीसी समाजाचे काॅलम त्यात समाविष्ठ नसल्याने होणाऱ्या जनगणनेत संपुर्ण भारतात किती ओबीसी समाज आहे हे समजु शकणार नाही.संपुर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर किंबहुना ५०% हुन अधिक ओबीसी समाजातील विविध जातींचे प्रस्थ वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. पण आजतागायत ओबीसी समाजातील विविध जातींची जनगणना न झाल्याने एकुणच ओबीसी समाज या बाबतीत अनभिज्ञ आहे. त्यामुळे या जनगणनेवर आधारित आरक्षण मिळण्यास अडचण निर्माण होत आहे व पुढेही होणार आहे . त्यामुळे ओबीसी समाजाची नाराजी मोठ्या प्रमाणावर वाढत असुन होणाऱ्या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यादृष्टीने ओबीसी समाजाला जागृत करणे सुरु झालेले आहे.
         
लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद चंद्रपुरच्या आगामी सर्वसाधारण सभेत , जनगणना २०२१ मध्ये ओबीसी प्रवर्गाचे काॅलम समाविष्ठ करण्याबाबतचा ठराव घेण्यासाठी विषय पत्रिकेवर नमुद करावे व सदर ठराव पारीत करुन शासनाकडे योग्य कार्यवाहीसाठी पाठवावे अशी विनंती करणारे निवेदन जि.प.सदस्य व भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी चंद्रपुर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांना दिले . 
           
यावेळी निवेदन देतांना जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सौ.नितुताई चौधरी , सभापती सुनिल उरकुडे , जि प. सदस्य यशवंत वाघ , विनोद चौधरी , आकापुर चे उपसरपंच मोरेश्वर निकुरे , माजी सरपंच श्रीमती निताताई बोरकर उपस्थित होते.