अखेर निराधार योजनेचे ३०३ प्रलंबित प्रकरणे मंजूर #niradharyojna - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर निराधार योजनेचे ३०३ प्रलंबित प्रकरणे मंजूर #niradharyojna

Share This
 • भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या मागणीला यश
 • निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा
खबरकट्टा / चंद्रपूर :कोरपना -
         


कोरपना तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे प्रलंबित होती, सदर प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावे अशी मागणी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी नायब तहसिलदार यांना केली होती,त्याअनुषंगाने नायब तहसिलदार व तहसिलदार कोरपना यांनी मागणीची दखल घेत तालुक्यातील ३०३ निराधार प्रकरणे मंजूर केलीली आहे,तसेच ७० प्रकरणे त्रुटीमुळे प्रलंबित ठेवलेली आहे.सदर प्रकरणे मंजूर झाल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
            
कोरपना तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती, ९ सप्टेंबर २०१९ रोजी शेवटची संजय गांधी निराधार योजनेची बैठक पार पाडली,परंतु त्यांनतर ३महिन्यानंतर एकही बैठक झालेली नाही त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे अर्ज मंजुरीकरिता प्रलंबित होते, जवळपास ३०० च्या वर प्रकरणे प्रलंबित होती.त्यामुळे लाभार्थ्यांना सदर बाबीचा फटका बसत होता,त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.मधल्या काळात निवडणूकीमुळे आचार संहिता व त्यानंतर राष्ट्रपती राजवटीमुळे सदर प्रकरणे मंजूर होऊ शकली नाही नाहीत,परंतु आता नवीन शासन राज्यात स्थापन झाल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेण्यात येऊ शकत होती त्यामुळे सदर योजनेची बैठक घेऊन सर्व प्रलंबित प्रकरणे मंजूर करून लाभार्थ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी नायब तहसिलदार श्री. विनय कौलवकर यांना केलेली होती.
          
त्याअनुषंगाने भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी वारंवार तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा केला, अखेर तहसिलदार यांनी आशिष ताजने यांच्या मागणीची दखल घेत कोरपना तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे मंजूर केलीली आहे.त्यामुळे निराधार लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.तसेच ज्या लाभार्थ्यांचे प्रकरणे मंजूर झालेली आहेत त्यांनी आपले आधार कार्ड व बँक खात्याची प्रत संजय गांधी निराधार कार्यालयात जमा करावी व तसेच ज्या लाभार्थ्यांचे अर्ज त्रुटी अभावी प्रलंबित आहेत त्यांनी सेतू  केंद्रावर जाऊन त्रुटी दूर कराव्या असे आवाहन आशिष ताजने यांनी केलेले आहे.