पोलिस वेल्फेअर शो चे यशस्वी आयोजन ! बघा लेझर शो ठरले आकर्षण #nehakakkar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पोलिस वेल्फेअर शो चे यशस्वी आयोजन ! बघा लेझर शो ठरले आकर्षण #nehakakkar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


चंद्रपूर पोलिस विभागाने यावर्षी जिल्हा पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी यांच्या नेत्रुत्वात प्रशीद्ध गायक कलाकार नेहा कक्कड आणि अनेक गायक कलाकार यांच्यासह ‘चला हवा येऊ द्या” कार्यक्रमाचे कलाकार भाऊ कदम, प्रसिद्ध डान्सर मानसी नाईक व इतर कलाकारांचा जो शो आयोजित केला त्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 

या कार्यक्रमात पोलिस हवालदार रमेश आत्राम यांनी या मंचावर गोंडी गीत सादर करून उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले.तर सुरुवातीला एका स्थानिक कलाकारांनी किशोर कुमार यांच्या आवाजातील गाणे गाऊन मंत्रमुग्ध केले.भाऊ कदम आणि त्यांच्या “चला हवा येऊ द्या”  या टीमने रषिकांचे चांगलेच विनोदी मनोरंजन केले तर नेहा कक्कड या गायिकेने आपल्या चित्रपटातील आणि अल्बम मधील गाणे गाऊन चंद्रपूरकरांची मन जिंकले. 

या कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी यांच्यासह जिल्हाधिकारी कुणाल खेमनार. अप्पर पोलिस अधिक्षक खैरे आणि इतर पोलिस अधिकारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून सुरुवात झाली.