ओबीसींची जनगणनेसाठी लढा उभारा - नाना पटोले : ओबीसींना शिष्यवृत्ती, जुनी पेन्शन योजना आणि आरक्षणासाठी कटीबद्ध -विजय वडेट्टीवार यांची ओबीसी महासंघाच्या जिल्हा अधिवेशनात सूतोवाच #nanapatole #obc - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ओबीसींची जनगणनेसाठी लढा उभारा - नाना पटोले : ओबीसींना शिष्यवृत्ती, जुनी पेन्शन योजना आणि आरक्षणासाठी कटीबद्ध -विजय वडेट्टीवार यांची ओबीसी महासंघाच्या जिल्हा अधिवेशनात सूतोवाच #nanapatole #obc

Share This
महाराष्ट्र राज्याचा ओबीसी खात्याचा मंत्री म्हणून ओबीसी बांधवाना न्याय देण्याचीच भूमिका स्विकारणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षी शिष्यवृत्ती, २००५ नंतर शासकीस सेवेत असलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचे १९ टक्के आरक्षण मिळविण्यासाठी सर्वंच्या सहकार्याने लढा देणार असल्याचे सूतोवाच राज्याचे इतर मागासवर्ग, मदत व पुर्नवसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले.


खबरकट्टा / चंद्रपूर :

आज दिनांक 25 जानेवारी 2020 राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ओबीसी जिल्हा अधिवेशनाच्या मंचावर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंदरजित सिंग, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष जस्टीस व्ही.ईश्वरैय्या, प्रा.सुशिला मोराळे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक जिवतोडे, प्रा.बबनराव तायवाडे, माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप आदी उपस्थित होते. 


या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. अशोक जीवतोडे यांनी यावेळी संबोधित केले. बबनराव तायवाडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये ओबीसींच्या आंदोलनासाठी संविधानाच्या कलम 304 मध्ये तरतूद असून त्यासाठी जागरुकतेने काम करण्याचे आवाहन केले. अन्य मान्यवर वक्त्यांनी देखील यावेळी जनगणना हा किती आवश्यक प्रश्न आहे याबाबतचे मत व्यक्त केले.
अधिवेशनात बोलताना ना.वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी खात्याचा मंत्री म्हणून निवड झाली मात्र मी पदभार स्विकारला नाही म्हणून माझ्यावर टिका झाली परंतू ज्या खात्याचा मंत्री झालो त्या खात्याला न्याय देण्यासाठी त्या खात्यात एक रूपयाच्या निधीची तरतूद नव्हती. उद्या ओबीसी बांधवांनी मंत्री म्हणून काय केले असा प्रश्न केला असता तर आम्ही काय उत्तर देणार होतो म्हणून आधी मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी खात्याला निधी देण्यासाठी आश्वासन मिळवून घेतले व त्यानंतरच पदभार स्विकारला असे सांगत यापुढे ओबीसी बांधवांसाठी काम करायचे आहे. 

सत्ता ही कायम नसते म्हणून सत्तेची आणि मंत्रीपदाची पर्वा न करता आम्ही समाजबांधवांना न्याय देताना कुठलीही तडजोड स्विकारणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगीतले. यावर्षी महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृह सुरू करणार आहे. पुढच्या वर्षी २०० वसतीगृह निर्माण करणार असल्याचे यावेळी उपस्थितांना सांगीतले. केंद्रातील भाजपा सरकारने ४२ आयएएस झालेल्या ओबीसी मुलांना अद्यापही नोकरीवर रूजू केलेले नाही यावरही वडेट्टीवारांनी केंद्र सरकारवर सडकून टिका केली. ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दाही मोठा आहे. केंद्राने तर ओबीसींचे आरक्षणच संपविले आहे मात्र यापुढे ओबीसींना १९ टक्के आरक्षण मिळाले पाहीजे, यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी वडेट्टीवार यांनी केले. 

बेरोजगारांसाठी काम करायचे आहे यावर्षी ओबीसींच्या ५०० मुलांना व्यवसाय, रोजगार देण्यासाठी १ लाख रूपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची योजना आणणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. तत्पूर्वी आयोजकांतर्पेâ ना.विजय वडेट्टीवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव अधिवेशनासाठी हजर झाले होते.

ओबीसींची जनगणनेसाठी लढा उभारा - नाना पटोले
ओबीसींच्या जनगणनेसाठी सर्वांन मिळून लढा उभारावा असे आवाहन करीत जर ओबीसींची जनगणना झाली तर ओबीसींना संवैधानिक सर्व अधिकार प्राप्त होतील. कुणापुढेही आपल्या हक्कासाठी भिक मागण्याची पाळी येणार नाही म्हणून समाजाने एकीची वङ्कामूठ ठेवून लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना.नाना पटोले यांनी केले. शेतकरी हा आपला मुख्य कणा आहे. 

सर्वाधिक शेतकरी ओबीसी बांधवच आहेत म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येताच या सरकारचे पहीले अधिवेशन नागपुरात झाले त्या पहील्याच अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना सांगून शेतकर्‍यांची कर्जमाफीची घोषणा करायला लावली असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगीतले. मी महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष असलो तरी ओबीसींच्या जनगणना झाली पाहीजे असा ठरावच विधानसभेत मांडला व तो एकमताने मंजूर झाला. एकानेही विरोध केला नाही. 

ओबीसी समाजाच्या हितासाठी ताकदीने पुढे गेलो तर वाटेत कुणीही आडवा येणार नाही असा विश्वासही यावेळी पटोले यांनी बोलून दाखविला. या निमित्ताने समाजासाठी एकीची मूठ मजबूत असली पाहीजे खासदारकी, आमदारकीसाठी समाज कमजोर होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी त्यांनी केले. आगामी २०२१ मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेत जर ओबीसींसाठी व्यवस्था नसेल तर सर्वांनी मिळून या जणगणनेवर बहिष्कार टाकावा त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही, असेही ते म्हणाले.