प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या !#murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या !#murder

Share This
खबरकट्टा / विदर्भ : अमरावती 

प्रेमप्रकरणातून एका तरूणीची हत्या करण्यात आली. तरूणीची हत्या केल्यानंतर तरूणानं स्वत:चा जीवन प्रवास देखील संपण्याचा प्रयत्न केला आहे. चाकू भोसकून हत्या करण्यात आलेल्या तरूणीचं नाव प्रणिता कोंबे असे आहे. अमरावतीच्या रेल्वे शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. तर तरूण गंभीर जखमी असल्याचे बोलले जात आहे.


१२ वीत शिकणाऱ्या प्रणिताला गार्डनमध्ये नेवून तिच्या पोटात चाकूने सपासप वार केले आहेत. पण या घटनेत तरूण गंभीर जखमी असून त्याच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अशा घटनांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहेत.

हत्या, अत्याचार, बलात्कार, ऍसिड हल्ला हे सर्व प्रकार वाढताना दिसत आहेत. अशा सर्व प्रकरणांमुळे देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात मुली सुरक्षित नसल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे. आता या प्रकरणामागे नक्की काय कारण आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.

अशा गुन्हांमध्ये अजुन किती मुलींचा बळी जाईल हा गंभीर प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून असे अनेक प्रकरणं समोर येतात. पण अशा घटनांना पूर्णविराम कधी लागले हे फक्त येणारा काळचं ठरवेल.