पोलीस दलात सातत्यपूर्ण उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी वकर्मचारी “गुणवत्तापूर्ण सेवा पदकाने” भारत सरकार तर्फे होणार सन्मानित : डॉ. महेश्वर रेड्डी- पोलीस अधीक्षक,चंद्रपूर व श्री.समिरसिंह साळवे-उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांचा समावेश #maheswarreddy - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पोलीस दलात सातत्यपूर्ण उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी वकर्मचारी “गुणवत्तापूर्ण सेवा पदकाने” भारत सरकार तर्फे होणार सन्मानित : डॉ. महेश्वर रेड्डी- पोलीस अधीक्षक,चंद्रपूर व श्री.समिरसिंह साळवे-उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांचा समावेश #maheswarreddy

Share This
खबरकट्टा /गडचिरोली : 


मा.गृहमंत्रालय, भारत सरकार यांच्या कार्यालयाकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्यपदक व गुणवत्तापूर्ण सेवा पदक आज जाहीर करण्यात आले आहेत. या यादीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधात प्रभावी व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक,अभियान व सध्या पोलीस अधीक्षक,चंद्रपूर येथे कार्यरत असलेले डॉ. महेश्वर रेड्डी( तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, अभियान) व सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड येथे कर्तव्यास असलेले श्री.समिरसिंह साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या समेत  श्री.मिठू जगदाळे(पोलीस नाईक),  श्री.अविनाश कांबळे,(पोलीस शिपाई),  श्री.वसंत आत्राम(पोलीस शिपाई ), श्री.हमीत डोंगरे(पोलीस शिपाई),  श्री सुरपत वड्डे(पोलीस शिपाई),  श्री.आशिष हालामी(पोलीस शिपाई ), श्री विनोद राऊत आणि पोलीस शिपाई श्री.नंदकुमार आग्रे या १० जणांचा समावेश आहे.

त्याचबरोबर पोलीस दलात सातत्यपूर्ण उत्कृष्टपणे सेवा बजावणाऱ्या श्री.अशपाक अली बाकर अली चिष्टीया,श्री.लक्ष्मण टेम्भुरने यांना “गुणवत्तापूर्ण सेवा पदक”जाहीर झाले आहे.पोलीस शौर्य पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्राप्त या अधिकारी व कर्मचारी यांचा उद्या प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे.मा.पोलीस अधीक्षक श्री.शैलेश बलकवडे सो.यांनी पदकप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.