मि पण पोलीस...! पोलीसांच्या कार्याने विध्यार्थी प्रभावित #maharastrapolice - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मि पण पोलीस...! पोलीसांच्या कार्याने विध्यार्थी प्रभावित #maharastrapolice

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : गोंडपिपरी -पोलीस म्हटले की राकड स्वभावाचा माणुस डोळ्यापुढे उभे राहतो. त्याला बघताच मनात भिती दाटुन येते. अश्यात पोलीसांचा कार्याची माहीती घेतलेल्या विध्यार्थ्यांनी " मि पण पोलीस ...!" असा नारा दिला. 

औचित्य ठरले महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे. धाबा उप पोलीस स्टेशनमध्ये विध्यार्थांना पोलीसांच्या कार्यपद्धतीची माहीती देण्यात आली. ,सोशल मिडीयाचा वापर कसा करावा ,गुड टच बॕड टच यातील फरक  यावर मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्रात 2 ते 8 जानेवारी महाराष्ट्र स्थापना दिन साजरा करण्यात येतो. स्थापना दिना निमित्ताने प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अश्यात धाबा पोलीसांनी राबविलेल्या उपक्रमाने विध्यार्थी प्रभावित झाले आहेत. " मि पण पोलीस...! " असा नारा विध्यार्थ्यांनी दिला. धाबा येथिल जनता कनिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थी,विध्यार्थ्यांना पोलीसांचा कार्यपध्दतीची माहीती देण्यात आली.

सोशल मिडीयापासून दूर राहण्याचा सल्ला ठाणेदार सूशिल धोपटे यांनी विध्यार्थ्यांना दिला. " गुड टच,बॕड टच " यातील फरक समजावून सांगण्यात आले. पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या शस्त्रांची माहीती देण्यात आली. हवालदार मनोहर मत्ते,निखाडे,दगडी यावेळी उपस्थित होते.