खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -
कोरपना तालुक्यातील नारंडा येथील पोचमार्गाची अतिशय खराब अवस्था झाली असून सदर रस्ता खराब असल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,तसेच पावसाळ्यात या रस्त्याने वाहतूक करताना अतिशय जास्त त्रास सहन करावा लागतो.
नारंडा येथील पोचमार्ग ग्रामीण मार्ग १५ असून हा जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतो,त्यामुळे सदर बाबीची दखल घेत भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्याकडे निवेदन देऊन पोचमार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे,तरी आपण येत्या काही काळात सदर रस्ता मंजूर करून निधी उपलब्ध करून देऊ असे अश्वासन संध्याताई गुरनुले यांनी आशिष ताजने यांना दिले.