कोरपना पंचायत सभापती पदी काँग्रेस च्या रुपालिताई तोडासे तर उपसभापती पदी सिंधुताई आस्वले यांची निवड #korpana - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरपना पंचायत सभापती पदी काँग्रेस च्या रुपालिताई तोडासे तर उपसभापती पदी सिंधुताई आस्वले यांची निवड #korpana

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -


कोरपना पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने काँग्रेस पक्षाच्या रुपालीताई तोडासे यांची सभापतीपदी निर्विरोध निवड करण्यात आली असून उपसभापती पदाकरीता काँग्रेस पक्षाच्या सिंधुताई आस्वले  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांचे विरोधात बीजेपीच्या नूतनकुमार जीवने यांनी उमेदवारी दाखल केल्याने निवडणुक घेण्यात आल्याने सिंधुताई अास्वले यांनी नूतनकुमार जीवने यांना धूळ चारुन उपसभापतिपदी विराजमान झाल्या.


निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार महेंद्र वाकलेकर व गटविकास अधिकारी पाचपाटील  संपूर्ण निवडणूक प्रक्रिया योग्य रितीने हाताळली.