अंबुजा फाउंडेशन व बहिणाबाई विद्यालयकडून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम #jivti - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अंबुजा फाउंडेशन व बहिणाबाई विद्यालयकडून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम #jivti

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती - संतोष इंद्राळे


जिवती-अंबुजा फाउंडेशन जिवती व बहिणाबाई विद्यालय नोकेवाडा यांच्या संयुक्त उपक्रमातून नोकेवाडा नजीक  नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.

     
काल बहिणाबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून मिरवणुक काढत 'पाणी अडवा-पाणि जिरवा,झाडे लावा-झाडे जगवा','पर्यावरनाचे संवर्धन झालेच पाहिजे'असे नारे देत नागरिकांत जनजागृती केली.नजीकच असलेल्या नाल्यावर बहिणाबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व अंबुजा फाउंडेशनच्या  वतीने वनराई बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले. भविष्यात पाण्याचे महत्त्व काय असणार ,पर्यावरण व निसर्गावर याचा काय परिणाम होणार याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी अंबुजा फाउंडेशनचे समन्वयक परमेश्वर कांबळे,प्रशांत मोरे,मोकिंद राठोड,बहिणाबाई विद्यालयाचे संपुर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.