अनोख्या पद्धतीने साजरी केली वडीलांची पुण्यतिथी : मेकाले कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम..! #jivti - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अनोख्या पद्धतीने साजरी केली वडीलांची पुण्यतिथी : मेकाले कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम..! #jivti

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती - संतोष इंद्राळे


शेणगाव .दि.२३ जानेवारी २०२० रोजी स्मुर्तीशेष शंकर मेकाले प्रतीष्ठान तथा श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय शेणगाव तर्फे , स्मुर्तीशेष शंकर मेकाले यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त , विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबीर आयोजित करुन स्मुर्तीशेष शंकर मेकाले यांना अनोखी श्रध्दांजली वाहण्यात आली.


     
सदर कार्यक्रमात १० वी , १२ वी नंतर पुढे काय ? या विषयावर गोंडवाना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.पांडुरंग सावंत यांनी विद्यार्थांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यानी ध्येयाशी व पालकांच्या श्रमाशी एकनिष्ठ राहुन अभ्यास करावा व यश मिळवावे असे त्यांनी प्रतिपादन  केले. ॲड. सचिन मेकाले यांनी, विद्यार्थ्यांच्या यशात पालकांची भुमिका या विषयावर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती रेणुका शंकर मेकाले यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी श्री शिवाजी कनीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत चोले सर होते. विचारमंचावर प्राचार्य कडवे सर ( प्रियदर्शनी कनीष्ठ महाविद्यालय शेणगाव )  श्री राजकुमार कुडमेथे सर , लोकशाही भारतचे साप्ताहिकाचे संपादक शब्बिर जहागीरदार,सामाजिक कार्यकर्ते हकानी शेख , अनिल पस्तापुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता, स्मुर्तीशेष शंकर मेकाले प्रतीष्ठान चे अध्यक्ष मानिक मकाले, अकबर शेख , वैजनाथ सावरगावे, संजय सुर्यवंशी, गजानन मोहिते, अनंता बेले आणि महाविद्यालयातील कर्मचार्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संदिप कांबळे यांनी केल तर आभार प्रदर्शन व  सुत्रसंचालन बालाजी शिवमोरे यांनी केले.