श्री विठ्ठलराव जाधव कला व विज्ञान महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न#jivti - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्री विठ्ठलराव जाधव कला व विज्ञान महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न#jivti

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती - संतोष इंद्राळे 

आज अंबुजा सिमेंट फाउंडेशन जिवती व श्री विठ्ठलराव जाधव कला व विज्ञान महाविद्यालय दमपूर मोहदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठलराव जाधव महाविद्यालय येथे शालेय विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा,व त्यांच्यामधील सुप्त कलागुण बाहेर यावेत,तसेच विध्यार्थ्यामध्ये बोलण्याची कला अवगत व्हावी या करिता वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केल होत.ही स्पर्धा दोन विभागात घेण्यात आली,प्राथमिक विभाग करीता विज्ञान आणि जीवन,आरोग्य एक संपत्ती, आणि शेतकऱ्यांच्या समस्या व उपाय हे विषय देण्यात आले होते,तसेच माध्यमिक विभागाकरिता समाजातील युवकांचे स्थान,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य की अयोग्य,शेतीकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे विषय देण्यात आले होते.


सदर स्पर्धेमध्ये विठ्ठलराव जाधव महाविद्यालय दमपूर मोहदा तसेच श्री अँब्रू नाईक आश्रम शाळा नगराळा येथील विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.प्राथमिक विभागात प्रथम सुखलाल राठोड,श्री अँब्रू नाईक शाळा नगराळा,व्दितीय प्रदीप चव्हाण,श्री विठ्ठलराव जाधव विद्यालय यांनी पटकाविला तर माध्यमिक विभागात प्रथम विशाल पवार,व्दितीय प्रतीक्षा बोलीवार,श्री विठ्ठलराव जाधव विद्यालय यांनी पटकाविला.


स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री विठ्ठलराव जाधव कला व विद्यान महाविद्यालय दमपूर मोहदा येथील सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांचे  सहकार्य लाभले तसेच श्री प्रफुल विधाते ,श्री मोकिंद राठोड प्रक्षेत्र अधिकारी अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांची विशेष उपस्थिती होती.