विदर्भ महाविद्यालयात एड्स जनजागृती व तपासणी शिबिर संपन्न #jivti - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ महाविद्यालयात एड्स जनजागृती व तपासणी शिबिर संपन्न #jivti

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती - संतोष इंद्राळे
          
वर्तमानात आपला देश एड्स सारख्या गंभीर बिमारीच्या विळख्यात सापडला असतांना या आजाराविषयी समाजात आणि मुख्यत्वे विद्यार्थी वर्गात जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक ठरते.याच उद्देशाने विदर्भ महाविद्यालय,जिवती च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने स्थापन केलेल्या रेड रिबन क्लब, ग्रामीण आरोग्य केंद्र गडचांदुर आणि संकल्प ग्राम विकास संस्था ( लिंक वर्कर प्रकल्प) चंद्रपुर यांनी संयुक्तपणे राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात एड्स जनजागृती आणि तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ग्रामीण आरोग्य केंद्र, गडचांदुर च्या वैद्यकीय मार्गदर्शिका आसमां पठाण यांनी एड्स होण्याची कारणे,या आजाराचे लक्षणे, त्याचा शरिरावर होणारा दुष्परिणाम आणि त्यावरील उपचार पद्धती या मुद्याला धरून सविस्तरपणे विद्यार्थ्यांस उद्बोधन केले. 


सोबतच अशोक शिंदे यांनी विद्यार्थांनी या आजाराविषयी जागरूक राहण्याची गरज असल्याचे  प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रक्त नमुने घेऊन एड्स आजाराची चाचणी व तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. एस.एच. शाक्य यांनी विद्यार्थ्यांना एड्स संदर्भात मार्गदर्शन करणारे आणि तपासणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना महाविद्यालया कडून सहकार्य करण्याची हमी दिली सोबत असे वेगवेगळ्या आजाराविषयी तपासणी शिबिर पुढील काळात महाविद्यालयात आयोजित केले जावे यासाठी प्रेरित केले. य़ा कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन राष्ट्रीय सेवा योजना तर्फे प्रा. गंगाधर लांडगे यांनी केले तर संचालन प्रा. गजानन राऊत आणि आभार प्रा. चतुरदास तेलंग यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. एस बी देशमुख,  प्रा. एल डी मंगाम, प्रा. संजय मुंडे आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.