वारकरी संतांचे साहित्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायक - श्री शिवाजी गुट्टे #jivti - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वारकरी संतांचे साहित्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायक - श्री शिवाजी गुट्टे #jivti

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती - संतोष इंद्राळे


विदर्भ महाविद्यालय़ाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

जीवती- विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणिवा विकसित करून, त्यांना राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी सक्षम बनवण्याचा मार्ग वारकरी संतांच्या साहित्यातून प्रशस्त होऊ शकतो. वारकरी संतांचे साहित्य हे विद्यार्थ्यांसाठी उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडून विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवण्यात मोठे योगदान देउ शकते, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वारकरी साहित्य वाचनाची गोडी निर्माण केली जावी. असे प्रतिपादन पुडियालमोहदा गावचे पोलिस पाटील श्री. शिवाजी गुट्टे यांनी केले.


विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जीवती द्वारा  आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा. जयंता वासाडे यांनी ' सद्यस्थितीत   रासेयो स्वयंसेवक या नात्याने समाजात वावरताना विद्यार्थ्यांचे कर्तव्य व जबाबदारी'  याविषयी सविस्तरपणे विवेचन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी रासेयो स्वयंसेवकापुढे सात दिवसीय शिबिरादरम्यान केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित असलेले पुडियालमोहदा गावचे सरपंच श्री. पुंडलिक गीरमाजी आणि उपसरपंच श्री. दत्ता कांबळे यांनी सदर राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सुरळीत पार पाडण्यासाठी गावाच्या वतीने सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पुष्पपोळ, प्रा. संजय मुंडे,  प्रा. गुणवंत मस्कले उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन राऊत तर आभार प्रा. गंगाधर लांडगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.