खबरकट्टा / चंद्रपूर : घुग्घुस -
वर्धा नदीवर गेल्या काही दिवसापासून सर्रासपणे अवयधपणे हजारो ब्रास रेती चोरी होत आहे.शुक्रवारी २४ जनवरीला तहसीलदार नीलेश दोड आणि तलाठी दिलीप पिल्लई व महसुल विभागाचे कर्मचारी यांनी वर्धा नदीवरील संपूर्ण रेती घाट सिल केला होता तरी रेती चोराची मूजोरी काही केल्या कमी होत नव्हती.
तहसीलदार नीलेश दौड यांनी स्वतः वर्धा नदीच्या पात्रात सुरु असलेल्या या अवैध रेती उत्खननावर धाड मारली व तिथे जेसीबीच्या साह्याने हायवा ट्रक मध्यें रेती भरतांना जेसीबी क्रमांक एम एच ३४ बी एफ ८७९० व हायवा ट्रक क्रमांक एम एच ३४ ए बी २९२७ ला जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा केले व पुढील आदेशा नुसार हे दोन्हीही ट्रक हायवा ट्रक घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये जमा राहील अशी माहिती पोलिसांनी दिली. या कार्यवाहीमुळे रेती तस्करी करण्याऱ्या मध्ये धडकी भरली आहे. आता किती दीवस हे रेती तस्करी थांबणार की या कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहेत.