गडचांदूर नगर परिषद विशेष : प्रभाग क्र.६ मध्ये अपक्ष उमेदवाचा वाढता प्रभाव : युवक वर्गातुन वाढता प्रतिसाद #gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर नगर परिषद विशेष : प्रभाग क्र.६ मध्ये अपक्ष उमेदवाचा वाढता प्रभाव : युवक वर्गातुन वाढता प्रतिसाद #gadchandur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
 

गडचांदूर शहर नगर परिषद निवडणूक येत्या ९ जनेवारी रोजी होऊ घातलेली आहे,विविध प्रभागातून  वेगवेगळ्या पक्षांकडून ८ ही प्रभागात उमेदवार उभे आहेत.

यामध्ये प्रभाग क्र.६ मध्ये गट ब मधून ९ उमेदवार उभे आहेत यामध्ये बहुतांश अपक्ष युवा उमेदवार उभे आहेत.यामध्ये अपक्ष सचिन गुरनुले,प्रहारतर्फे रुपेश रोहने,अपक्ष रौफ खान वजीर खान, मनसेतर्फे ऋषिकेश भारती उभे आहेत.तसेच भाजपातर्फे गोपाल मालपाणी, काँग्रेस तर्फे चेतन शेंडे,शिवसेनातर्फे सरवरभाई, व इतर उमेदवार उभे आहेत,यामध्ये अपक्ष असलेले युवा उमेदवार सचिन गुरनुले यांना युवक वर्गाचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.तसेच प्रभागात त्यांच्याबद्दल अनेक नागरिकांमध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सचिन गुरनुले हे भारतीय जनता पक्षात निष्ठावंत युवा कार्यकर्ते म्हणून गेल्या १० वर्षापासून काम करीत होते,पक्षाच्या प्रत्येक कार्यात सक्रियपणे काम करीत होते,पक्षाचा कोणताही कार्यक्रम असो,कार्यक्रमाचे नियोजन त्यांचा सक्रियपणे कार्य केले परंतु जेव्हा नगर परिषद निवडणूकीत पक्षातर्फे  उमेदवारी देण्याचा प्रश्न आल्यावर जिल्हा पदाधिकारी सचिन गुरनुले यांच्या उमेदवारी देण्याच्या तयारीत असताना,शहरातील भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे तिकीट नाकारून सचिन गुरनुले यांचा राजकीय बळी देण्याचे काम शहरातील भाजप नेत्यांनी केले.

परंतु त्यांनी अपक्ष उमेदवारी भरत  त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाल मालपाणी यांना घाम फोडला आहे,सचिन गुरनुले यांच्या उमेदवारीमुळे युवा वर्गात प्रचंड प्रचंड प्रतिसाद मिळत आहे,तसेच इतर अपक्ष उमेदवार यांनी सुद्धाही प्रचारात आघाडी घेतली आहे.