चंद्रपूरविषप्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या #farmerssuicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूरविषप्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या #farmerssuicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपूरी-


ब्रह्मपुरी तालुक्यातील चिंचोली (बु) येथील शेतकर्‍याने राहत्या घरी कीटकनाशक औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना दि. २९ जानेवारी बुधवारला उघडकीस आली आहे.


मृतक इसमाचे नाव देवेंद्र खुशाब दिवटे (४१) असून मृतकाने पहाटे चार वाजता घरीच विषारी औषध प्राशन केले. कुटुंबियांना बाथरूममध्ये विषारी औषधीचा वास येऊ लागल्याने त्यांनी तात्काळ मृतकाची विचारपूस केली आणि त्याच्या तोंडातून वास येत असल्याने लगेच ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने तात्काळ गडचिरोली येथे हलविण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला त्यांनतर मृतकाला गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे पोहचताच डॉक्टरांनी तपासून सदर इसमाला मृत घोषित केले मृतकाच्या पश्यात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरीवार असून कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. मृतकाने विषारी औषध करून आपली जीवनयात्रा का संपविली याचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. मृतकाचे गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.