चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी फसवी ठरल्या नंतर दारूबंदी समर्थक 'सामाजिक कार्यकर्ते' कुठे गेले होते....???#darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी फसवी ठरल्या नंतर दारूबंदी समर्थक 'सामाजिक कार्यकर्ते' कुठे गेले होते....???#darubandi

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : (नरेंद्र सोनारकर - 9112316645)

वर्धा,गडचिरोली पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी सपशेल फसवी निघाल्या नंतर हे तिन्ही जिल्हे दारूमुक्त कसे करता येईल;यावर गेली 5 वर्षात कुठलेही भाष्य न करणारे आता चंद्रपूर जिल्ह्यातील फसवी दारूबंदी उठविण्याची चर्चा सुरू होताच अनेक सामाजिक कार्यकर्ते दारूबंदीच्या समर्थनात सरसावले आहेत...त्यात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग आघाडीवर आहेत.


दारू बंदीचे समर्थन करतांना दारू बंदी मुळे वर्षभरात ९० कोटी रुपयांची दारू कमी झाल्याचाही त्यांचा दावा असून,दारूबंदी लागू होण्यापूर्वी कायदेशीर-बेकायदेशीर अशी १९२ कोटी रुपयांची दारू खपत होती,दारू बंदी नंतर १ वर्षांनी केलेल्या सर्व्हेक्षणात ९० कोटी रुपयांची दारू कमी झाल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.गम्मत म्हणजे उपन्न वाढविण्याचे अनेक चांगले मार्ग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आता मुद्दा असा आहे की डॉ.बंग साहेबांनी केलेलं सर्व्हेक्षण किती प्रभावी आहे,हा त्यांचा अभ्यासाचा भाग असला तरी त्यांनी जिल्ह्यातील कोणत्या भागाचे सर्वेक्षण केले होते,हे कळायला मार्ग नाही.जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला गेल्या पाच वर्षात कोट्यवधींचा दारू साठा दरवर्षी नष्ट केल्या गेला.जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात, शहरात,गावात,गल्लीत,चौकात दारू मिळत नाही,निदान एवढंच बंग साहेबांनी सांगावं.निश्चितच दारूचे व्यसन जीवघेणे आणि संसाराची नासधूस करणारे आहे.

पण,नुसते समर्थन करायचे म्हणूनच दारू बंदीचा आग्रह धरायचा?कोणतीच उपाय योजना अथवा कर्तव्य म्हणून चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्या पेक्षा सारे खापर पोलिसांच्या डोक्यावर फोडायचे?दारू बंदी करा,,,दारू बंदी करा,,,अशी शिरा तुटेपर्यंत मागणी करायची,आणि दारूबंदी लागू झाल्यानंतर हीच दारू बंदी फसवी ठरल्या नंतर त्यावर कुठलीही जबाबदारी न स्वीकारता इतरांकडे बोटं दाखवायची??

चंद्रपूर जिल्हा दारू बंदी नंतर लगेच महिन्या दोन महिन्यांनी अवैध दारूचा पुरवठा या जिल्ह्यात होऊ लागला.हळू हळू दारू तस्करीच्या हा व्यवसाय कोट्यवधींच्या घरात गेला.हजारो बेरोजगारांनी या व्यवसायात उडी घेतली.वाट्टेल त्या शकली लढवून आजही सातत्याने जिल्ह्याच्या काना-कोपऱ्यात बिनधास्त दारू विक्री सुरूच आहे,,,आणि ही फसवी दारू बंदी असेपर्यंत ते सुरूच राहणार आहे...मग दारूबंदीचा आग्रह धरणाऱ्या आमच्या सामाजिक कार्यकर्त्या भगिनी,सामाजिक कार्यकर्ते या पैकी कुणीच समोर आले नाही...?काय कारण असावे???

बंग साहेब चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीचे समर्थन करतात.राजस्व वाढविण्याचे अनेक चांगले मार्ग असल्याचे सांगतात.पण गेली अनेक वर्षा पासून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील फसव्या दारूबंदी संदर्भातही त्यांनी राजस्व कमविण्याचे "चांगले मार्ग" सुचविल्यास गंधिकजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्याचे कल्याण तरी होईल...एव्हणा वर्धा रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या हॉटेलवर पाहिजे ती देशी-विदेशी दारू २४ तास उपलब्ध असते....

डॉ. अभय बंग साहेबांनी दारू पिण्यार्यांना अनेक रोग होतात,अशी चिंताही व्यक्त केली.पण दारूबंदी जिल्ह्यात सप्लाय होणारी नकली दारू प्रवरा(देशी),ऑफिसर चॉईस,आर.एस,ब्लेंडर प्राईड,इम्पोरीव ब्ल्यू इत्यादी ब्रॅण्ड ची नकली दारू गेली पाच वर्षे पिणाऱ्यांचे काय हाल झाले असतील???मुळात जे दारूच पीत नाहीत त्यांनी अशा फसव्या दारू बंदीचे समर्थन करणे हास्यास्पद वाटते..! होय,मी दारू पितो...म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक शहरात-गावात,चौका-चौकात,गल्ली बोळात दारू विक्री होते हे मी दाव्याने सांगू शकतो.दारू बंदी नंतर एकाही बेवड्याने दारू सोडल्याचे माझ्या तरी समोर एकही उदाहरण नाही....बंग साहेबांचे दारू बंदी समर्थन त्यांच्या दृष्ट्रीने योग्यही असेल कदाचित,पण फक्त दारू बंदीचे समर्थन करून चालणार नाही,जिल्हा दारू मुक्त झाला पाहिजे,यासाठी बंग साहेब स्वतः काही जबाबदारी घेतील का?असा प्रश्न आहे.


वर्धा जिल्हा दारूबंदी आहे म्हणतात.व या जिल्ह्यात दारू बंदी हटविण्या बाबत कोणतीही चर्चा नाही.आणि या जिल्ह्याची गांधी जिल्हा म्हणून देशभरात ओळख असल्याने या जिल्ह्यातील दारूबंदी  हटविण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही...त्यामुळे मा.डॉ.अभय बंग यांनी चंद्रपूर जिल्ह्याची जास्त चिंता करण्यापेक्षा वर्धा जिल्ह्यात वाहणाऱ्या अवैध दारू च्या महापुराला बांध बांधता येईल का ते बघाव...खरंच या पावन भूमीला आपण दारू मुक्त केलं तर इतिहासात आपण नेहमीच अजरामर व्हाल,यात तिळभरही संशय नसावा...शेवटी दारू बंदी हटवायची की ठेवायची हा निर्णय मात्र सत्ता धीशांचा.….!