चंद्रपूर प्रीमियर क्रिकेट लीग' चा थरार आता यु-ट्यूबवर #CPL - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर प्रीमियर क्रिकेट लीग' चा थरार आता यु-ट्यूबवर #CPL

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चंद्रपूर प्रीमियर लीग 

चंद्रपूरच्या लाईफ फाउंडेशन संस्थेच्या वतीने गेली 6 वर्षे स्थानिक पोलिस फुटबॉल मैदानावर चंद्रपूर प्रीमियर क्रिकेट लीग टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 7 वे वर्ष असून 14 जानेवारी पासून ही स्पर्धा क्रिकेट चाहत्यांच्या भरगच्च उपस्थितीत सुरू आहे. एकूण 16 संघ यात दरवर्षी सहभागी होत जिल्ह्यातील नव्या-जुन्या क्रिकेटपटूना संधी देत असतात.IPL च्या धर्तीवर शिस्तबद्धरित्या खेळवल्या जाणा-या या स्पर्धेचे यंदाचे लीग सामने 26 जानेवारी रोजी संपुष्टात आले. 28 जानेवारी पासून क्वार्टर फायनल सामन्यांची सुरुवात होत आहे. क्वार्टर, सेमी आणि फायनल सामन्यांचा थरार थेट यु-ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे.

यासाठी गुगलवर WDZ या लिंक वर जावे लागणार असून chandrapur premier league 2020 टाईप केल्यास या सामन्यांचा लाईव्ह आनंद घेता येणार आहे. CPL आयोजन समितीने यंदा स्पर्धेत नवे व उपयुक्त प्रयोग केले असून त्यामुळे स्पर्धेचे निकाल आणि अंतिम विजेते याबाबत उत्कंठा वाढली आहे.


क्वार्टर फायनल मध्ये लिथल वेपन्स, चंद्रपूर बुलेट्स, ब्लॅक गोल्ड, चांदा फोर्ट , सिल्व्हर स्टोन, व्हाईट एश, थ्री एसेस, गोंडवाना बुल्स हे 8 संघ दाखल झाले आहेत. CPL च्या सातव्या पर्वाचा अंतिम सामना रविवार 2 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत खेळला जाणार आहे. क्रिकेट चाहते आणि रसिकांनी सर्वच सामन्याना उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे आवाहन CPL आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.