धोपटाळा ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा.#congress - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धोपटाळा ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा.#congress

Share This
-काँग्रेसचे राजु पिंपळशेंडे सरपंचपदी ७ विरूद्ध ६ मतांनी विजयी. 

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा :-

राजुरा तालुक्यातील मौजा धोपटाळा ग्रामपंचायत येथे शिवसेना - भाजपची सत्ता होती. मात्र लोकसभा निवडणुकी पुर्वी शिवसेनेचे काही सदस्य आमदार सुभाषभाऊ धोटे आणि नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यामुळे येथील सत्तेची समीकरणे बदलली आणि बहुमता अभावी सत्ताधारी सरपंचाला राजीनामा द्यावा लागला होता. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेसचे राजु शंकर पिंपळशेंडे हे ७ विरूद्ध ६ अशा निर्णायक मताने सरपंचपदी विजयी झाले.

           
त्यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादा पाटील लांडे, जावेद पटेल, निरीक्षक मनोहर उलमाले, काँग्रेसचे ग्रा. प. सदस्य राजाराम येल्ला, डॉ. गेडाम, ब्रिजेश जंगीतवार, सौ. जगताप मॅडम, संगीता हिवराळे, पायल गव्हारे, देवराव चन्ने, माधव बोढे, दिलीप मुडपल्लीवार, पुरूषोत्‍तम अन्ना, रत्नाकर गर्गेलवार, अशोक कुडे, रामपूरचे ग्रा प सदस्य जगदीश बुटले, धनराज चिंचोलकर, विकास देवाडकर, आकाश, रवी यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
           
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रेव्न्यु इन्स्पेक्टर गोरे साहेबांनी आणि सहायक म्हणून पटवारी सुभाष साळवे, ग्रामसेवक आकुलवार यांनी काम पाहिले. सरपंच पदाच्या निवडणूकीत काँग्रेसने भाजप, शिवसेना आणि शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना हानून पाडीत निर्णायक विजय मिळवुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.