चिमूर पं.स च्या सभापती पदी लता पिसे तर उप सभापती पदी रोशन ढोक विजयी #chimur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर पं.स च्या सभापती पदी लता पिसे तर उप सभापती पदी रोशन ढोक विजयी #chimur

Share This
 • चिमूर पंचायत समितीवर कांग्रेसचा झेंडा कायम
 • सभापती व उपसभापती पदांची निवडणूक शातंतेत संपन्न


खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )

चिमूर पंचायत समिती च्या सभापती पदाची निवडणूक हि ओबीसी खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने आज दिनांक.०१/०१/२०१९ ला संपन्न झालेल्या निवडणुकीत लताताई पिसे या सभापती पदावर विराजमान झाल्या तर रोशन ढोक यांची उप सभापती पदी विराजमान झाले यांनी ६ मते घेऊन विजयी झाले. 

      
चिमूर पंचायत समिती मध्ये भाजप चे अजहर शेख, पुडलीक मत्ते,प्रदीप कामडी असून नर्मदा रामटेके यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजप चे संख्याबळ ४ वरून ३ झाले तर कांग्रेस चे शांताराम सेलवटकर, रोशन ढोक विद्या चौधरी, भावना बावनकर, लता पिसे,गीता कारमेगे,व नर्मदा रामटेके, असून संख्याबळ ७ असून  सर्व सदस्य सभागृहात हजर होते.

     
आज झालेल्या निवडणुकीत कांग्रेस कडून सभापतीपदासाठी  लता पिसे तर भाजप कडून प्रदीप कामडी  यांनी नामांकन भरले लता पिसे यांना ६ मते मिळाल्याने सभापती पदी विजयी झाल्या तर उपसभापती पदी रोशन ढोक व गीता कारमेगे यांच्या लढत झाली असता  रोशन ढोक हे ६ मते घेऊन विजयी झाले.

    
निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार संजय नागटिळक यांनी काम पाहिले .संवर्ग विकास अधिकारी पुरी साहेब सुद्धा उपस्थित होते चिमूर पंचायत समिती वर कांग्रेस ची सत्ता होती आणि पुन्हा कांग्रेस आली .यावेळी कांग्रेस तालुका अध्यक्ष माधव बिरजे ,ओम खैरे , सविता चौधरी , रुषी पिसे अरुण पिसे राका चे राजू मुरकुटे विकास शिंदे उपस्थित होते.