कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ होऊ नये यासाठी महिलांनी सतर्क राहावे #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ होऊ नये यासाठी महिलांनी सतर्क राहावे #chandrapur

Share This
-समाजकार्य महाविद्यालय पडोली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये एड. जमदार मॅडम यांचे प्रतिपादन.

खबरकट्टा / चंद्रपूर : 


कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ नवीन नाही, तरीही त्याविरोधातली कायद्याची अंमलबजावणी शहरात अद्याप प्रभावीपणे केली जात नाही. शहरात ही स्थिती असेल तर ग्रामीण पातळीवर काय? खेडय़ातील स्त्रीही आज मोठय़ा प्रमाणावर काम करते आहे. रोजंदारी, मजुरी करते आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीच्या बाबत देखील सुरक्षिततेच्या बाबतीत अनेक प्रश्न आहेत.त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ ’ या कायद्याचा कसा वापर करता येईल याबद्दल एडवोकेट जमदार मॅडम यांनी सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथे पार पडलेल्या कार्यशाळेमध्ये बोलताना सांगितले आहे.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजकार्य महाविद्यालय पडोलि चंद्रपूरचे प्राचार्य डॉक्टर सुनील साखरे सर ,प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक टिकले सर, तसेच मंचावर अंतर्गत तक्रार समितीचे  सदस्य प्रा.डॉ कल्पना कवाडे मॅडम, प्रा.डॉ. कापसे मॅडम, प्रा. डॉ. नरखेडकर मॅडम ,प्रा. डॉ. ठाकूरवार मॅडम,प्रा. मणुरे सर आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे संचालन मोहन विलास चुकाबोटलावर या विद्यार्थ्याने केले तर आभार प्रदर्शन पुनम रामटेके या विद्यार्थिनींनी केले.