खबरकट्टा / चंद्रपूर :नागभीड -
शिक्षणापासून वंचित असणाऱ्या स्त्रियासाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या ,समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहा. शिक्षक आशिष गोंडाणे सर यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून सहा. शिक्षिका आशा राजुरकर मँडम, सुरेखा कावळे मँडम, रिता बघेले मँडम यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईच्या जीवनावर वर्ग ४ थी च्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले .यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेच्या जीवनावर प्रकाश टाकला.अध्यक्ष आणि उपस्थित पाहूण्यांनी सावित्रीबाईं च्या कार्याची महती पटवून दिली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून क्रिडा सत्राच्या बक्षिस वितरणाचा सोहळा पार पाडण्यात आला. क्रिडा सत्राचे उद्घाटन संस्थाध्यक्ष व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे हस्ते व मुख्याध्यापक गोकुल पानसे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले होते.
या क्रिडासत्राचे आयोजन विद्यार्थ्यांमधिल सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने करण्यात आला.यामध्ये रनिंग, एक मिनिट शो,खो-खो,लंगडी, कबड्डी, स्लो सायकलिंग यासह विविध अशा प्रकारच्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
बक्षिस वितरक म्हणून लाभलेल्या श्रीमती निताताई निनावे मँडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र देऊन त्यांचा गुण गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिडासत्र व सांस्कृतिक प्रमुख स.शि. कु. किरण वाडिकर मँडम , तर आभारप्रदर्शन वर्ग ७ वी ची विद्यार्थ्यांनी कु. सुलक्ष्मी शेरकी हीने केले.
संपूर्णं कार्यक्रम व क्रिडा सत्राचे यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक गोकुल पानसे यांचे मार्गदर्शनात सहा.शिक्षक आशिष गोंडाणे, आशा राजुरकर मॅडम , किरण वाडीकर मॅडम, पराग भानारकर, सतिश जिवतोडे, सुरेखा कावळे मॅडम, प्रणय दरवरे, रिता बघेले मॅडम यांनी परिश्रम घेतले.