खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड
नागभीड तालुक्यातील नांदेड येथील इसम काही कामा निमित्त नांदगाव येथे गेला असता अचानक रस्त्यालगत दबा धरून वाघाने हल्ला करून इसमाला जखमी केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली.
नागभीड तालुक्यातील नांदेड येथील जितेंद्र रतिराम शेंन्दरे वय २७ वर्ष हा इसम आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी पालेभाज्या ची मागणी करण्यासाठी (आर्डर) देण्यासाठी सिन्देवाही तालुक्यातील नांदगाव येते जात असताना वाटेतच नांदगाव परीसरात रस्त्याच्या बाजूला दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यात जितेंद्र गंभीर जखमी झाला. लगेचच सहकार्याने घाबरून तळोधी येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेतला.
या घटनेची माहिती तळोधी आरएफओ ला मागितले तर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. सबंधित वन विभागाने काय कार्यवाही केली हे अद्यापही कळू शकले नाही. संबंधित वन विभागाकडून जखमी ला नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.