वरूर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वरूर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
स्त्री शिक्षणाचे  प्रणेते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती जगद्गुरू तुकोबाराय ,सार्वजनिक वाचनालय वरूर (रोड) इथे आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभिस  महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विशाल शेंडे ,आदर्श तेलंग, उत्कर्ष गायकवाड,महेश वसाके यांनी केले. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितले होते.

घरातील बाई शिकली कि सार कुटुंब साक्षर होते हे ओळखून सावित्रीबाई फुले यांनी भारतामध्ये महिला आणि मुलींना शिक्षणासाठी शाळेचे दरवाजे खुले केले असे गावातील प्रतिष्ठित नागरिक रामदास पुसाम यांनी सांगितले.यावेळी गौरव जीवतोडे ,स्वयंम रामटेके ,समीक्षा जीवतोडे , आकांक्षा भोंगळे, स्नेहा वांढरे या बालवक्त्यांनी कांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.


या कार्यक्रमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत त्यांच्या जीवणावरी समीक्षा जीवतोडे या विद्यार्थिनीने अतिशय सुंदर नाटक सादर केले, या नाटकाला बघून नागेश भोंगळे यांच्याकडन २००रु तर रामदास पुसाम यांच्याकडन १००रु , किशोर भोंगळे यांच्याकडन १००रुपये देऊन तसेच मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट व पुष्पगुच्छ पेन देऊन सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शेंडे यांनी तर आभार सौरभ हिवरे यांनी केले.