खबरकट्टा / यवतमाळ :गणेश पेटकर
मौजा अडेगाव खंड-2 चे तलाठी एच. के.पेंदोर हे जेवपासून अडेगाव खंड-2 साजावर रुजू झाले तेव्हापासून समस्त शेतकरी त्यांच्या काम करण्याच्या प्रक्रियेला त्रस्त होते.
साधारण ७/१२ काढण्यासाठी गेले असता लिंक नाही आहे असे विविध करणे सांगून सामान्य शेतकार्यना महिना-महिना भर वाट पाहण्यास भाग पडावे लावत होते.तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता लागणारे दाखले सुद्धा वेळेवर न देत असल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी व सामान्य नागरिक या बोगस,निष्काळजी पटवाऱ्याचा सामान्य जनता त्रास सहन करत होती.
शेतकरी सन्मान योजनेचे पैसे आजपर्यंत शेतकऱ्यांना पटवारीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ भेटला नाही.इतर कोणत्याही कामाकरिता गेले असता पाटवाऱ्याची वागणूक सुद्धा अरेरावी असल्यामुळे व त्यांच्या कामाला त्रस्त असल्याने समस्त शेतकऱ्याच्या मनात निष्काळजी पणामुळे जनतेच्या मनात असंतोष होता.
शेतकऱ्यांचे विविध प्रश्न लक्षात घेऊन शेतकरी पुत्र युवा समाजसेवक मंगेश पाचभाई यांच्या नैतृत्वात झरी तहसिलवर शेकडो लोकांचा मोर्चा नेण्यात आला होता.
मंगेश पाचभाई यांच्या पाठपुरावठामुळे व त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे या सर्व प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन निष्काळजी तलाठ्यावर उंचीत कारवाही करून निष्काळजी पटवारी एच. के. पेंदोर याना त्वरित निलंबित करण्यात आले.
याच आनंदात समस्त अडेगाव खंड-2 चे शेतकरी मिठाई वाटून गावामध्ये आनंद व्यक्त केला.